Saturday, 23 January 2021

शुद्ध मराठी या सदस्याने मनोगत या संकेतस्थळावर केलेले मार्गदर्शन

Back-up of manogat.com site page

http://www.manogat.com/node/25612

प्‌रा, त्‌रा, ड्‌या ? प्रे. शुद्ध मराठी (रवि., ३०/११/२०१४ - १२:४४).
प्रा,  त्रा किंवा ड्या यांसाठी जर प्‌रा, त्‌रा, ड्‌या असली अक्षरे टाईप होणार असतील तर आम्हांला उबंटू नको.
 

जोडाक्षरे प्रे. ओक (मंगळ., ०२/१२/२०१४ - १५:०२).
या लाईव्ह सीडीत जोडाक्षरे नीट दिसत आहेत. खाली दिलेला स्क्रीन-शॉट पाहा.
दुवा क्र. १
 

दुवा? प्रे. शुद्ध मराठी (बुध., ०३/१२/२०१४ - १८:४७).
आपण दिलेला दुवा उघडून पाहिला. कोणताही स्क्रीन-शॉट दिसत नाही.  मनोगताच्या याच पानाची मोठ्या टायपातली आवृत्ती दिसते.  कृपया दुवा दुरुस्त करून द्यावा, किंवा तो तथाकथित स्क्रीन-शॉट उघडून दाखवावा.

आणखी शंका-
१. ऍ टाईप करता येईल की ए‍ॅ उमटवावा लागेल ?
२. अक्षरावरची चंद्रकोर शिरोरेषेला चिकटलेली असेल की  दोघांत जाणवेल इतके अंतर असेल ? ही चंद्रकोर शिरोरेषेला समांतर असेल की तुर्की टोपीवरच्या चाँदाप्रमाणे किंवा पाकिस्तानच्या झेंड्यावरच्या चांदतार्‍यातल्या  चंद्राप्रमाणे तिरपी असेल ?  मल्याळीध्ये 'उ'या डोक्यावर एक तिरपी चंद्रकोर काढून अतिर्‍हस्व उ काढतात.  युनिकोडने तिथूनच ही तिरपी चंद्रकोर उचलली.  ही चंद्रकोर सरळ असली पाहिजे, तरच ती मराठी वाटेल.
३. हल्लीचा ख, हा 'व'ला दुगाणी झाडणार्‍या  र सारखा दिसतो.  त्याच्याऐवजी संस्कृत आणि मराठीत असतो तसा 'उभट र'शेजारी 'व' असेलेला ख काढता येईल का ?
४. मराठी ल लिहिता येईल, की हिंदी  ’ल’च  लिहावा लागेल?  असेच मराठी श आणि हिंदी श बद्दल. दोन्ही लिहिण्याची सोय हवी.
४. र्‍हस्व ऌ लिहिता येईल का?  गमभन वर पूर्वी फक्त दीर्घ ॡ होता.  आता माहीत नाही.
५. दारिद्र्याला' या शब्दातला द्र्या, हा  द्र ला जोडलेला पाऊण य असा काढता येईल ?
६. पाऊण य हे अक्षर स्वतंत्रपणे टाईप करता येईल ?
७. र्‍य हा मराठी दिसेल की ' डॅश शेजारी य ' असा दिसेल ? डॅशवर शिरोरेषा नसते, पण र्‍यावर अखंड शिरोरेषा असते. '
८. त्र ला ला वाटी जोडून काढलेला जुन्या पद्धतीचा उभ्या बांधणीचा मराठी क्र टाईप करता येईल? तो स्पष्टपणे वाचता येतो,  हल्लीचा क्र आहे की क्न ते समजत नाही.
९. श्र मधला 'श' स्वतंत्रपणे टाईप करता येईल ?
१०. र्‍हस्व इकारासाठी वेलांटी देताना ती व्यंजनातल्या शेवटच्या अक्षरापर्यंत पोचायला हवी.  त्यासाठी फॉन्ट्समध्ये  किमान तीन वेगवेगळे स्पॅन असलेल्या र्‍हस्व वेलांट्या हव्यात. असे करणे शक्य होईल? पुस्तकांच्या छपाईत न्स्ट्यि‌‌ मधल्या वेलांटीची सुरुवात कान्यापासून होऊन पाऊण य च्या डोक्यापर्यंत पोचलेली असते.   ती तशीच संगणकावरही टाईप करता आली पाहिजे.
११. र्‍य आणि न्य  यांतले अर्धे र आणि न हे वेगळे दिसले पाहिजेत. इथे मनोगतावर दिसत नाहीत.
१२. अ, आ, अ‍ि, अ‍ी, अ‍ु. अ‍ू. अ‍ृ, अ‍ॄ, अ‍े,  अ‍ै ही बाराखडी टाईप करता आली पाहिजे‌. सावरकरांचे लिखाण  लिहून दाखवताना गरज पडते.
१३. नुक्ता असलेल्या अक्षरांची बाराखडी लिहिणे अनेकदा जमत नाही.  ते शक्य व्हावे. विशेषतः  च़मच़ा लिहिताना ’च़ा’मधला नुक्ता च ऐवजी च़च्या कान्याला चिकटतो, तसे ( चा़ ) होऊ नये.
१४. विसर्ग आणि कोलन वेगळे दिसले पाहिजेत. विसर्ग हा अक्षराचा भाग असतो त्यामुळे त्याच्यावर शिरोरेषा असते, कोलनवर नसते.  उदा० दुःख आणि दु:ख‌‌‌. पहिल्यात विसर्ग आहे, तर दुसर्‍यात कोलन.,  वगैरे. ( खरे तर दुःखमध्ये विसर्ग नाही.  जो विसर्गासारखा दिसतो आहे, त्याला संस्कृतमध्ये जिव्हामूलीय म्हणतात.  विसर्ग असता तर उच्चार दुहुख असा झाला असता. )
१५. स्वरावर रफार काढता आला पाहिजे.  म्हणजे हविर्अन्न,  कुर्आन,  पुनर्आखणी,  पु‌नर्उच्चार,  पुनर्उभारणी,  आशीर्उक्ती,  पु‌नर्ऐक्य,  निर्ऋत,  नैर्ऋत्य, असले शब्द लिहिता येतील, वगैरे.


अक्षराचे आकारमान वाढवता येते प्रे. प्रशासक (बुध., ०३/१२/२०१४ - १८:५८).
११. र्‍य आणि न्य  यांतले अर्धे र आणि न हे वेगळे दिसले पाहिजेत. इथे मनोगतावर दिसत नाहीत.
हा अक्षरवळणाचा (फाँट )दोष नाही. आपला संगणक आणि न्याहाळक ह्यांच्या क्षमता/मर्यादांवर हे अवलंबून आहे. फाफॉ न्याहाळकात कंट्रोल-अधिक(+) ह्या कळी वापरून अक्षराचे आकारमान वाढवता येते. तसे करून पाहिल्यास हा फरक पाहता येईल, असे वाटते.

 
माझी उत्तरे प्रे. ओक (गुरु., ०४/१२/२०१४ - १७:२३).
>> १. ऍ टाईप करता येईल की ए‍ॅ उमटवावा लागेल ?
हो येईल. जसे. . .   ॲपल
(उजवीकडील अल्ट् की) alt key + shift + A (कगप फोनेटिक कीबोर्ड)

>> २. अक्षरावरची चंद्रकोर शिरोरेषेला चिकटलेली असेल की  दोघांत जाणवेल इतके अंतर असेल ?
चंद्रकोर अगदी वर आहे . आणि तिरपी नसून सरळ आहे .  मुळात ही जबाबदारी फॉन्टची आहे . या लाईव्ह सिडीत काही (६-७) मराठी फॉन्ट असून सगळे फॉन्ट तपासायला मला वेळ झालेला नाही. पण मी अक्षरयोगीनी या फॉन्टमध्ये पाहिले .

>> ३. हल्लीचा ख, हा 'व'ला दुगाणी झाडणार्‍या  र सारखा दिसतो.  त्याच्याऐवजी 'उभट र'शेजारी 'व' असेलेला ख
हा मुद्दा मला समजला नाही. मला जो ख दिसतो आहे तो समाधानकारक आहे .

>> ४. मराठी ल लिहिता येईल, की हिंदी ’ल’च लिहावा लागेल?
हा देखील फॉन्टचा विषय आहे , युनिकोडचा नव्हे. अक्षरयोगिनी फॉन्टमध्ये शेंडीवाला श , लसणीतला ल तर इतर फॉन्टमध्ये हिंदी पद्धतीचा श व ल दिसत आहेत. 
 
>> ४. र्‍हस्व ऌ लिहिता येईल का? गमभन वर पूर्वी फक्त दीर्घ ॡ होता.

र्‍हस्व ऌ
(उजवीकडील अल्ट् की) alt key + shift + L (कगप फोनेटिक कीबोर्ड)
दीर्घ ऌ
(उजवीकडील अल्ट् की) alt key + shift + L + alt key +  l   (कगप फोनेटिक कीबोर्ड)

>> ५. दारिद्र्याला' या शब्दातला द्र्या, हा द्र ला जोडलेला पाऊण य असा काढता येईल ?
अक्षरयोगिनी फॉन्टमध्ये योग्य प्रकारे दिसत आहे .

>> ६. पाऊण य हे अक्षर स्वतंत्रपणे टाईप करता येईल ?
प्रयत्न केला. अजून जमलेले नाही.

>> ७. र्‍य हा मराठी दिसेल की ' डॅश शेजारी य ' असा दिसेल ? डॅशवर शिरोरेषा नसते, पण र्‍यावर अखंड शिरोरेषा असते. '
अक्षरयोगिनी फॉन्टमध्ये योग्य प्रकारे दिसत आहे .

>> ८. त्र ला ला वाटी जोडून काढलेला जुन्या पद्धतीचा उभ्या बांधणीचा मराठी क्र टाईप करता येईल? तो स्पष्टपणे वाचता येतो,  हल्लीचा क्र आहे की क्न ते समजत नाही.
हा मुद्दा नीट समजला नाही.

>> ९. श्र मधला 'श' स्वतंत्रपणे टाईप करता येईल ?
हे बहुतेक शक्य नाही. पण 'क'चा हात मोडून त्याला विकलांग बनविणे शक्य आहे असे दिसते. जसे . . .
k + f + (उजवीकडील अल्ट् की) alt key + shift + 7   (कगप फोनेटिक कीबोर्ड)

'क'चा पाय मोडून त्याला दुसरे अक्षर जोडता येईल.  उदा. पक्का शब्द दोन्ही प्रकारे लिहीता येईल. (कगप फोनेटिक कीबोर्ड)
पक्का (जोडाक्षराची उभी मांडणी) -  p + k + f + k + a
पक्‌का (जोडाक्षराची आडवी मांडणी) - p + k + f + [ (उजवीकडील अल्ट् की) alt key + shift + 6] + k + a 

यात  झिरो विड्थ नॉन जॉईनर  (६) व झिरो विड्थ जॉईनर  (७) असून जोडाक्षरांची उभी मांडणी करण्याकरता (आवश्यकतेनुसार) ७ तर आडव्या मांडणीकरता ६ वापरा. आवश्यकतेनुसार अशाकरता म्हटले आहे की "बाय डीफॉल्ट " बहुतेक फॉन्टमध्ये उभी मांडणी होते. 

>> १०. र्‍हस्व इकारासाठी वेलांटी देताना ती व्यंजनातल्या शेवटच्या अक्षरापर्यंत पोचायला हवी.  त्यासाठी फॉन्ट्समध्ये  किमान तीन वेगवेगळे स्पॅन असलेल्या र्‍हस्व वेलांट्या हव्यात. असे करणे शक्य होईल? पुस्तकांच्या छपाईत न्स्ट्यि‌‌ मधल्या वेलांटीची सुरुवात कान्यापासून होऊन पाऊण य च्या डोक्यापर्यंत पोचलेली असते.   ती तशीच संगणकावरही टाईप करता आली पाहिजे.

माझ्या पाहण्यात असा फॉन्ट आलेला नाही. आपल्याला माहीत असल्यास कळवावा. म्हणजे तो ह्यात सामील करून घेता येईल. (मात्र लिनक्समध्ये मुफ्त आणि मुक्तस्रोत फॉन्टच स्वीकारता येतात. )

>> ११. र्‍य आणि न्य  यांतले अर्धे र आणि न हे वेगळे दिसले पाहिजेत. इथे मनोगतावर दिसत नाहीत.
अक्षरयोगिनी फॉन्टमध्ये योग्य प्रकारे दिसत आहे .

>> १२. अ, आ, अ‍ि, अ‍ी, अ‍ु. अ‍ू. अ‍ृ, अ‍ॄ, अ‍े, अ‍ै ही बाराखडी टाईप करता आली पाहिजे‌. सावरकरांचे लिखाण लिहून दाखवताना गरज पडते.
हो. ही बाराखडी मी लिहून पाहिली. 
(कगप फोनेटिक कीबोर्ड) (उजवीकडील अल्ट् की) alt key + a ह्या 'अ' ला अनुक्रमे  a , i , shift + i , u , shift + u alt + l , e , shift + y जोडले की ही बाराखडी तयार होते.

>> १३. नुक्ता असलेल्या अक्षरांची बाराखडी लिहिणे अनेकदा जमत नाही. ते शक्य व्हावे.

कगप मराठीत हे शक्य नसले तरी इन्क्रिप्ट वा आयट्रान्स या पर्यायी इनपुट मेथडद्वारे हे नक्की शक्य आहे . मी प्रयत्न केला नाही. वेळ मिळाला की करेन .

>> १४. विसर्ग आणि कोलन वेगळे दिसले पाहिजेत. विसर्ग हा अक्षराचा भाग असतो त्यामुळे त्याच्यावर शिरोरेषा असते, कोलनवर नसते. उदा० दुःख आणि दु:ख‌‌‌. पहिल्यात विसर्ग आहे, तर दुसर्‍यात कोलन., वगैरे. ( खरे तर दुःखमध्ये विसर्ग नाही. जो विसर्गासारखा दिसतो आहे, त्याला संस्कृतमध्ये जिव्हामूलीय म्हणतात. विसर्ग असता तर उच्चार दुहुख असा झाला असता. )

युनिकोडमध्ये विसर्गाला स्वतंत्र स्थान आहे .

दुवा क्र. १

हा विसर्ग वापरून आपण दुःख शब्द लिहू शकतो तो असा . . .
दुःख d + u + shift H + shift K (कगप फोनेटिक कीबोर्ड)
कोलन वापरुन लिहलेला दु:ख शब्द असा:
दु:ख d + u + : + shift K (कगप फोनेटिक कीबोर्ड)

वर दिलेले दोन्ही शब्द गुगलमध्ये टाकले तर वेगवेगळे रिझल्ट मिळतात. म्हणजे हे शब्द स्वतंत्र आहेत. आता सर्व फॉन्टमध्ये ते जवळपास सारखेच दिसतात हे मान्य.

>> १५. स्वरावर रफार काढता आला पाहिजे.  म्हणजे हविर्अन्न,  कुर्आन,  पुनर्आखणी, पु‌नर्उच्चार, पुनर्उभारणी, आशीर्उक्ती, पु‌नर्ऐक्य, निर्ऋत, नैर्ऋत्य, असले शब्द लिहिता येतील, वगैरे.

हविर्अन्न = h v i r f (Alt_R + a) n f n (कगप फोनेटिक कीबोर्ड)
अशाच प्रकारे इतर शब्द लिहीता येतील.
_____

ह्या व्यतिरिक्त भारताचे नवीन रुपयाचे चिन्ह देखील यात काढता येते .
₹  (उजवीकडील अल्ट् की) alt key + shift + 4  (कगप फोनेटिक कीबोर्ड)
____

वर उल्लेखलेला कगप कीबोर्ड मॅप येथे पाहता येईल.
दुवा क्र. २

कळफलक व युनिकोड मॅपिंग येथे :
दुवा क्र. ३
_____

प्रतिसाद ही सीडी वापरूनच लिहीला आहे .  त्यासाठी आयट्रान्स व कगप या दोन्ही इनपुट मेथडचा उपयोग केला. अॅटोकरेक्टमुळे बर्याचश्या चुका आपोआप सुधारल्या तर इतर चुकांसाठी लाल रंगावर राईट क्लिक केली. तरी चुका आहेतच :)

आपण लिहिले आहे की "दिलेला दुवा उघडून पाहिला. कोणताही स्क्रीन-शॉट दिसत नाही. मनोगताच्या याच पानाची मोठ्या टायपातली आवृत्ती दिसते. " मनोगताचे हेच पान या सिडीतून कसे दिसते ते दाखविणारा तो स्क्रिन- शॉट आहे. त्या चित्रात जोडाक्षरे कशी दिसतात ते दाखविण्याचा प्रयत्न होता. आपण ही सिडी प्रत्यक्ष वापरून पाहिली तर जास्त चांगले होईल.

 
स्पष्टीकरण प्रे. शुद्ध मराठी (मंगळ., ०९/१२/२०१४ - १९:३६).
>>३. हल्लीचा ख, हा 'व'ला दुगाणी झाडणार्‍या  र सारखा दिसतो.  त्याच्याऐवजी 'उभट र'शेजारी 'व' असेलेला ख
हा मुद्दा मला समजला नाही. मला जो ख दिसतो आहे तो समाधानकारक आहे .

स्पष्टीकरण : हल्ली आपण जो ख लिहितो तो आधी हिंदीने बनविलेला आणि काही वर्षांनी महाराष्ट्र सरकारने
बरीच खळखळ करून स्वीकारलेला ख आहे.  हिंदी लिपीत अक्षरे हात न उचलता लिहिण्याची पद्धत आहे.
हिंदी लिहिताना आधी शिरोरेषा काढतात आणि मग तिच्या खाली  अक्षर काढतात, मराठीत त्याच्या उलट. त्यामुळे हिंदी अक्षरे
मराठी अक्षरांपेक्षा वेगळी दिसतात.

उदा० हिंदी र लिहिताना आधी शिरोरेषा, मग हात न उचलता एक उभी रेघ, आणि मग त्या उभ्या रेघेच्या डावीकडून
किंचित वर गेल्यावर आतून गाठ मारून एक तिरपी रेघ काढली की झाला र.   मराठी र काढताना आधी  'ग'चा कंस  काढतात,
मग त्या ग च्या गाठीतून एक तिरपी रेघ काढतात.  शेवटी शिरोरेषा.  थोडक्यात काय तर हिंदी र आतल्या गाठीचा असतो,
तर मराठी र ची गाठ बाहेरून असते.

अशाच प्रकारे हिंदी ख काढताना आधी शिरोरेषा, तिला जोडून हिंदी र आणि त्याच र चे शेवटचे टोक उजव्या बाजूने
मध्ये एक गाठ मारून परत शिरोरेषेपर्यंत ओढायचे.   म्हणजे हात न उचलता ख लिहिता येतो.  ह्या ख चे वर्णन,  'र'ने  'व'ला
मागच्या पायाने दुगाणी झाडली आहे असे करता येते.  मराठी आणि संस्कृत ख हा 'रव' असा, म्हणजे र आणि व शेजारी शेजारी
लिहिल्याप्रमाणे  दिसतो.  यांतला 'र' हा नेहमीच्या 'र'पेक्षा अरुंद असतो आणि त्याच्या अगदी जवळ  'व' असतो.  हे अक्षर ख  आहे हे सहज ओळखता येते.  त्यामुळे वानरवेडे आणि वानखेडे  हे शब्द वाचताना घोटाळा होत नाही.

>>> ४. ..दीर्घ ऌ
(उजवीकडील अल्ट् की) alt key + shift + L + alt key +  l   (कगप फोनेटिक कीबोर्ड)

बापरे! दीर्घ ॡ काढताना वरीच खटपट करावी लागते आहे. नशीब, मराठीत या दीर्घ ॡ चा एकही शब्द नाही.

>>> ८. . त्र ला ला वाटी जोडून काढलेला जुन्या पद्धतीचा उभ्या बांधणीचा मराठी क्र टाईप करता येईल? तो स्पष्टपणे वाचता येतो,  हल्लीचा क्र आहे की क्न ते समजत नाही.

>>> ९.  पक्का (जोडाक्षराची उभी मांडणी) -  p + k + f + k + a

स्पष्टीकरण : जोडाक्षराची उभी जोडणी म्हणजे एकाखाली एक व्यंजने लिहिणे. क्क लिहिताना एकाच उभ्या रेषेला 'क'च्या दोन्ही वाट्या जोडल्या की उभ्या जोडणीचा क्क होतो.  आडवी जोडणी म्हणे स्वरदंड नसलेला क्‍  काढून त्याला एक पूर्ण क जोडणे.  आडव्या जोडणीची जोडाक्षरे रुंद असल्याने जास्त जागा व्यापतात.
 क्त हा आडव्या जोडणीचा तर त्त काढून त्याला 'क'ची वाटी जोडली की उभ्या जोडणीचा क्त होतो.  

तसेच क्र (क्‍र) बद्दल. 'क' लिहिताना जर त्याचा स्वरदंड आखुड असेल तर क'ची डावीकडची वाटी जमिनीला
टेकण्याची भीती असते. असे झाले की त्याला तिरप्या रेषेचा 'र' जोडणे अवघड होते, आणि ते जोडाक्षर क्‍न आहे की क्‍र हे नीटसे समजत
नाही.  त्यासाठी आपल्या पूर्वजांनी एका खास क्‍र ची रचना केली. 'त्र' काढून त्याला 'क'ची वाटी जोडून हा खास क्‍र बनतो.

दुवा क्र. १  या 'दुव्यावर
मराठी पहिले पुस्तक 
नावाच्या पुस्तकाच्या १८व्या पानावर आपल्याला हा क्‍र पाहता येईल.

'क'ला तिरप्या रेघेचा र जोडणे जसे अवघड जाते तसेच 'त'ला आणि 'श'ला.  त्यासाठी त्‍र हे अक्षर त्र असे, 
आणि श्‍र हे अक्षर श्र असे काढण्याची आपल्या पूर्वजांनी पद्धत पाडली.  संगणकावर जर श्र, श्व, श्न, श्ल, श्च  ही अक्षरे अशीच 'श्री'तला श काढून लिहिता आली नाहीत, तर आपण आपली परंपरा जपली नाही असे होईल.....

विशेष :
क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरे असली तरी त्यांचा लिखाणात भरपूर वापर आहे.  म्हणूनच ती अक्षरे क्‍ष आणि ज्‍ञ अशी लिहून लिखाण बोजड होऊ नये याची काळजी घेतली गेली आहे.


 
फॉन्टशी संबंधित नवीन माहिती प्रे. ओक (गुरु., ११/१२/२०१४ - ०४:३७).
आपण १८७० सालातील पुस्तकाचा हवाला देऊन ती परंपरा आपण जपली पाहिजे असा आग्रह धरला आहे. पण त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून महाराष्ट्र सरकारने ६ नोव्हेंबर २००९ या दिवशी जो अध्यादेश काढला तो येथे वाचता येईल.

दुवा क्र. १

पान ३ वर 'ख' चे लेखन करताना 'रव' असे न करता 'ख' असे खालच्या बाजूने जोडून करावे अशी विशेष सूचना आहे.
तसेच पान ६ वर चक्र या शब्दाचे जोडाक्षर लेखन विकल्पाने क्र (त्र च्या वाटीला जोडलेला क) असे करण्यास हरकत नाही अशी "सूट" दिली आहे. याचा अर्थ क्र चे लेखन क्न सारखे दिसले तरी ते तसेच करणे अपेक्षित आहे.

>> संगणकावर जर श्र, श्व, श्न, श्ल, श्च  ही अक्षरे अशीच 'श्री'तला श काढून लिहिता आली नाहीत, तर आपण आपली परंपरा जपली नाही असे होईल
संगणकावर मला अश्व शब्द 'श्री'तला श काढून लिहिता येत आहे. अर्थात आडव्या मांडणीतला श्व म्हणजे 'श' चा दंड काढून त्याला 'व' जोडण्याचा पर्यायही उपलब्ध आहे (नॉन जॉइनर वापरून).
_____

थोडक्यात आपण मांडलेले मुद्दे फॉन्टशी संबंधित आहेत. आपल्याला 'ख' हे अक्षर, 'क्र' हे जोडाक्षर आणि अक्षराच्या डोक्यावर फिट्ट बसणारी वेलांटीची टोपी हवी असली तर त्यासाठी बहुतेक नवीन फॉन्ट बनवावा लागेल. १८७० साली खिळ्यांवर छपाई होत असे. कुणाला तरी सांगून हवे तसे खिळे बनविणे शक्य होते. फॉन्ट असे सोप्या पद्धतीने तयार करता येत नाहीत. बहुतांश मराठी मंडळींना या तीन मुद्द्यांमुळे मराठीची उज्ज्वल परंपरा धोक्यात येत आहे असे वाटत नसावे.
_____

चर्चा सुरू करण्याचा माझा उद्देश ही लाईव्ह सीडी कशी वाटते हे विचारण्याचा होता. एकानेही ही सिडी वापरून पाहिली, चांगली वाटली किंवा निरुपयोगी वाटली अशा प्रकारची टिप्पणी केली नाही. पण आपल्या चर्चेतून फॉन्ट / युनिकोड संबंधित काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या ही जमेची बाब.

 
त्यासाठी बहुतेक नवीन फॉन्ट बनवावा लागेल. प्रे. शुद्ध मराठी (गुरु., ११/१२/२०१४ - १०:५९).
काही हरकत नाही.  नवीन फॉन्‍ट हवाच आहे. निदान हवी तशी अक्षरे असलेला एक कॅरॅक्टर मॅप असला तरी काम भागेल.  त्या मॅपमध्ये काय काय हवे ?
पाऊण य,  (हा राजहंस नावाच्या  फॉन्ट‌मध्ये होता. )
'श्री'तला 'श', 
त्र'ला वाटी लावलेला क्‍र, 
त्रची नुसतीच चोच. (हीही 'राजहंस'मध्ये होती.)
दीर्घ  लृ,
सावरकरी 'र',   तिरप्या रेघेला मध्याच्या खाली डाव्या बाजूला स्वरदंड जोडून काढलेला 'र',  काकपाद किंवा हंसपाद  चिन्हासारखा दिसणारा ट-ठ-ड-ढ-छ यांब्ना जोडायचा 'र'
ज्याला २००९ च्या सरकारी परिपत्रकात काकपद म्हटले ते  कॅरेट नावाचे काकपाद (हंसपाद) चिन्ह).  हे टाईप केल्यावर दोन अक्षरांच्या मध्ये तळाशी उमटले पाहिजे.
पायमोडके अ् आणि उ्,
जर्मन 'यू उमलॉट' (Ü) चा उच्चार दाखवणारे मराठी अक्षर -स्वरदंड नसलेल्या अर्ध्या अ ला जोडलेला यू
र्‍हस्व ए,  र्‍हस्व ओ, 
ऋकार आणि रफार  (रेफ) या चिन्हांसकट सर्व (खाली वर्तुळ नसलेली) विरामचिन्हे, 
साहेब, शुद्ध आदी शब्दांचे लघुचिन्ह (सोा, शुा, वगैरे),
आद्याक्षरांपुढे हल्ली पूर्णविराम देतात त्याऐवजी पूर्वी काढत असत ते  छोटे शून्य ( ॰ ),
ॐ चे चिन्ह,
'ह'च्या पोटात  न, व, ण,  ल, तिरप्या रेघेचा  'र' आदी लिहून काढलेली संस्कृत जोडाक्षरे,
स्पोर्ट्‌स लिहिण्यासाठी र्ट च्या खाली लिहिलेला 'स', 
ट. ठ. ड. ढ. छ आदी अक्षरांचे द्वित्त करण्यासाठी त्यांच्या खाली लिहिलेली अनुक्रमे तीच मुळाक्षरे
ट. ठ. ड. ढ. छ आदी अक्षरांना खालच्या बाजूला जोडलेली  व, स आदी अक्षरे,
फ़ॅन्सी आदी शब्द लिहिण्याची सोय.  (मनोगतावर निव्वळ कळफलक वापरून हा शब्द लिहिता येत नाही)
नुक्तायुक्त अक्षरांच्या बाराखड्या आणि जोडाक्षरे
'क' आणि 'फ' च्या उजव्या वाट्या.  यांतली 'फ'ची वाटी 'भ'ला जोडून हिंदी झ काढता येईल.
हिंदी ण ( एा )
हिंदी क्ष.  (हा ज्ञ सारखा दिसतो. ज्ञ मध्ये आडव्या रेघेला /र/ जोडला आहे, क्षमध्ये 'द' जोडलेला असतो.
एकाहून अधिक कमी जास्त रुंदी (स्पॅन) असलेल्या र्‍हस्व मात्रा (राजहंसमध्ये अशा दोन र्‍हस्व मात्रा होत्या. )
नॉरदॅम्टन हा शब्द दॅ वर रफार देऊन लिहिता येत नाही, त्यासाठी रफार चिन्हाच्या पोटात चंद्र काढायची सोय हवी. असले तयार अक्षर कॅरॅक्टर मॅपमध्ये असले की काम भागेल.

माझ्याकडे राजहंस फॉन्ट‌‌ आहे, पण तो फ्लॉपीमध्ये असल्याने आधुनिक संगणकांवर वापरता येत नाही.


महाराष्ट्र सरकारया या २००९च्या परिपत्रकाआधी एक परिपत्रक होते.  त्याची लिंक माझ्याकडे आहे, पण दुर्दैवाने ती उघडता आली नाही.  त्या परिपत्रकात 'ख' चा उल्लेख नव्हता, असे मला आठवते आहे.  ह्या 'व'च्या पेकाटात मागच्या मागे लाथ घालणारा 'र' असलेल्या  'ख'चा स्वीकार करण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने खूप खळखळ केली होती, हे मी आधीच लिहिले आहे. त्यामुळे आपल्या नवीन फॉन्‍टमध्ये जुना 'ख' हवाच हवा.  ह्या नवीन 'ख'ला तिरप्या रेघेचा 'र'  जोडणे जड जाते. त्यामुळे ख्रिश्चन आदी शब्द नीट दिसत नाहीत.  ज्या कारणासाठी आपल्या पूर्वजांनी 'क'ला तिरप्या रेघेचा 'र' जोडायची मनाई केली होती, त्या कारणासाठी खाली गोल वाटी असलेल्या शब्दांना तसला 'र' जोडू नये अशी व्यवस्था केली होती.  म्हणून ट्र, ड्र, छ्र  आदी अक्षरे बनली.  'ख्र' मध्ये जर नवीन ख असेल तर त्यालाही कॅरेट जोडायला हवे होते..

आधी लिहिल्याप्रमाणे क चा स्वरदंड आखुड असेल तर 'क'च्या वाट्या अक्षरांच्या तळाला जवळजवळ टेकतात आणि तसला 'क' हा आखुड पायाच्या आणि लठ्ठ पोट आणि  लठ्ठ पार्श्वभाग असलेल्या यक्षासारखा दिसतो.  हिंदी अक्षरे लांबी रुंदी सारखी असलेल्या चौरसात बसणारी असल्याने, हिंदी पुस्तकांत हा बुटका यक्ष हमखास भेटतो.  मराठी अक्षरे उभट असल्याने आपला क त्या मानाने उंचापुरा असतो.

मुळाक्षरांत ऍ आणि ऑ ची जागा ए आणि ओ या पुढे असावी असा मुळात दिल्लीचा आदेश होता.  महाराष्ट्र सरकारने तो शिरसावंद्य केला असला तो मला तो मान्य नाही.  ऍ आणि ऑ ची जागा अनुक्रमे अ आणि आ च्या पुढे असावी असे मला वाटते. तसे केले तरच कंप, कप, आणि कॅप हे शब्द जवळपास येतील. सरकारी आदेश मानला तर कॅप हा शब्द शब्दकोशात केपनंतर येईल.  हे उचित नाही.

अनुस्वार स्वरादीच असतो असे मानणेही योग्य नाही.  उदा० 'टपालहंशील'मधील अनुस्वार स्वरादी नाही. 'हं'चा उच्चार करताना आधी अनुस्वाराचा  आणि मग स्वराचा उच्चार होतो.  शब्दकोशात शब्द घेताना अक्षर, अनुस्वारयुक्त अक्षर आणि विसर्गयुक्त अक्षर एकसमान मानले पाहिजे. मोल्सवर्थ-कॅन्डी‌‌ने असेच केले आहे.  असे केले की तें (=इट्) आणि ते (=दे) हे शब्द जवळ येतील, आणि मध्ये कुणी तेंडुलकर घुसणार नाही. असे केल्यानेच कांहीं, कांही,  आणि काही हे शब्द एका रांगेत येतील.   महाराष्ट्र सरकारमध्ये सगळेच शहाणे बसले आहेत असे नाही.
 
१८७० सालातील पुस्तक प्रे. शुद्ध मराठी (शनि., १३/१२/२०१४ - १३:४२).
>>आपण १८७० सालातील पुस्तकाचा हवाला देऊन ती परंपरा आपण जपली पाहिजे असा आग्रह धरला आहे.<<
दुसरा मार्ग नव्हता.  २००० सालातील  पुस्तकाचा संदर्भ देता आला असता, पण ती पुस्तके प्रताधिकारमुक्त नसल्याने आंतरजालावर सापडणार नाहीत.  हे १८७० सालचे पुस्तक शोधायलाही काही कमी तकलीफ झाली नाही.

मुद्दा किती सालचे पुस्तक हा नाही, तर तिरप्या रेघेचा 'र'  सहजासहजी जोडता येत नाही  म्हणून ट. ठ. ड, ढ, छ, त, श, या व्यंजनांना केली तशीच   'क' साठी केलेली जराशी  वेगळ्या प्रकारची खास व्यवस्था आपण मोडीत काढायची का, हा आहे


Thursday, 15 November 2018

ऋग्वेदातील स्त्रीदेवता

१३/८/८९ पाठशाळा - ऋग्वेद मंत्र - ऋग्वेदातील स्त्रीदेवता

या मंत्रात खालील स्त्रीदेवतांचा उल्लेख आहे.
गुंगूदेवी - वकृत्वशक्ती
सरस्वती - विद्यादेवी
राका - दातृत्वशक्ती
सीनीवाली - पोषक शक्ती
वरुणानी - जीवन शक्ती
इंद्राणि - प्रभुत्व शक्ती

गुंगूदेवी -
शतेषु जायते शूरः । सहस्त्रेषु च पंडितः ॥
वक्ता दशसहसत्रेषु । दाता भवति वा न वा ॥

वकृत्वशक्ती हजारात एखाद्याकडे असते. याचा अर्थ सभेत बोलणे नव्हे तर वकृत्वशक्ती याचा अर्थ आहे समजावण्याची शक्ती. वकृत्वशक्ती म्हणजे convincing power. उत्तम वकृत्त्वाकरता खालील गुण आवश्यक आहेत. १) निर्भयता २) निश्चितता ३) चातुर्य
'कैर्मयासहवक्तव्यं' म्हणजे मला कोणाबरोबर बोलायचे आहे याची जण जाण हवी. जर ऐकणाऱ्याची ग्रहणशक्ती तितकी नसेल तर काय होते? उदाहरण -
१) यं ब्रह्मा वरुणेंद्र … - गावचा पटेल विचारतो 'यम सुरवातीला का?' एक हुशार पंडित उत्तर देतो, 'वास्तविक यम शेवटला होता पण त्याचं जे वाहन आहे 'रेडा' त्याला हा अपमान सहन झाला नाही व त्याने मुसंडी मारून यमाला पहिल्या स्थानावर आणले.'
२) विद्वान राणीने पाणी न उडवण्याबद्दल राजाला विनंती केली. 'मोदकैः सिंचमाम्' यावर राजाने मोदकांनी आंघोळ घातली. 'मातृहस्तेन भोजनं, मात्रुमुखेन विद्या' समजावण्याची शक्ती प्रत्येक आईजवळ असते.

सरस्वती -
“सा विद्या या विमुक्तये' मुक्ती म्हणजे विकार, भय व दुःखापासून मुक्ती. आज ज्याला विद्या म्हटले जाते ती विद्या नसून 'कला' आहे. आजचे शिक्षण हे कलेचे शिक्षण देते. ४ विद्या व ६४ कला यात फरक आहे.

सिनीवाली -
पोषक शक्ती - सत् वृत्ती व सत् गुणांचे पोषण करणारी देवता.
आजचा भागवत सांगणारा कीर्तनकार प्रजेचे रंजन करू शकतो पण पोषण करू शकत नाही. प्रत्येक आईला वाटते की आपल्या मुलाचे चांगल्या तऱ्हेने पोषण व्हावे पण तिची कृती तशी नसते. थोरांची चरित्रे डोळ्यासमोर ठेवल्यास पोषण होईल. रामभक्त भरत, वैराग्यमूर्ती शुक, निश्चयमूर्ती प्रल्हाद, सत्यमूर्ती हरिश्चंद्र, गांधारी, रघू, राणा प्रताप, शिवाजी असे. आज पोषक आहारावर भर दिला जातो. (nutrition food) पण पोषक विचारांकडे दुर्लक्ष होते. (nutrition thoughts).

Wednesday, 19 September 2018

वेदांचे सार

ग्रंथप्रवेश
१) वेदांतील काव्य
वेद चार आहेत. यांत १०५५२ मंत्र आहेत. (ऋग्वेदात) सामवेदात, यजुर्वेदात तर अथर्ववेदात मंत्र आहेत. यजुर्वेद व अथर्ववेदांत काही उतारे गद्य आहेत. वेदांवर आधारलेले ब्राह्मण, उपनिषदे, आरण्यके इ. वगळून केवळ चार संहिता मिळून एकूण मंत्रसंख्या आहे. ऋग्वेदातील काही मंत्र इतर वेदात आले आहेत. तेवढी पुनरुक्ती आहे.
वेदांविषयी लक्षात घेण्याची पहिली गोष्ट ही आहे की ते काव्यरूपात आहेत. गद्य आहे ते ही लयबद्ध आहे. मानवजातीचे उपलब्ध प्राचीनतम काव्य व गद्य साहित्य वेदात आहे. हिंदूंचा धर्म व संस्कृती यांचे मूळ वेदात आहे. हे वेद कोणाही पौर्वात्य व पाश्चिमात्य तज्ञांनी चार हजार वर्षांआधी मानलेले नाही. काही तर त्याचा काळ त्यापेक्षा फार पूर्वीचा मानतात.
वैदिक काव्य हे अप्रगत आहे असे सामान्यतः म्हटले जाते. 'अप्रगत' याचा अर्थ केवळ लोकगीत अथवा पोवाडे असा असेल तर ते सत्यापासून फार वेगळे मानावे लागेल. कोणत्याही अप्रगत कवीला पुढील ओळी म्हणता आल्या नसत्या.
विचार हा तिच्या शय्येवरील उशी होत
आणि दृष्टी हेच तिच्या डोळ्यातील काजळ होत.

वेदातील काव्याला अप्रगत म्हणायचे तर ते त्यातील विशुद्धता व उत्तर काळातील संस्कृतीतील दोषांपासून अलिप्तता यास अनुलक्षून म्हणता येईल. (वेद युगाला आपण सत्य युग म्हणतो) मनुष्याच्या प्राथमिक जीवनाविषयक निकडी (अन्न, अभय व संभोग) यातील अथवा मनाच्या व्यावहारिक व मननशील शक्तीमधील अथवा जड व सूक्ष्म यांतील समतोल बिघडून अनवस्था उत्पन्न झालेली येथे दिसत नाही. क्षत्र म्हणजे राजकीय सत्ता व ब्रह्म म्हणजे अध्यात्मिक बल यांची संपूर्ण एकात्मता ज्यांचे उद्दीष्ट आहे अशा परिपूर्ण जीवनाची वेदात संकल्पना आहे.
ग्रीक वाड्मयातील वैश्विक शोकांतिका व तिने आणलेली निराशा व यातना अथवा दुभंगलेला आत्मा व त्यामुळे होणाऱ्या वेदना व तडफड यांचा मागमूसही वेदात नाही. ख्रिस्ती धर्मातील पापाची जाणीव व अनुषंगिक आत्मक्लेश यांचाही आढळ वेदात नाही. बौद्ध व बुद्धोत्तर काळातील जीवनाविषयी भ्रमनिरास, मायावाद व घृणा आणि नकारात्मक दृष्टीकोन वेदात नाही. जीवन व मरण यांना वास्तवतेने मान्य करून, जीवन कलह व मनुष्याच्या मर्यादा ओळखून वेदांनी सत्य, शिव व सुंदर ही जीवनमूल्ये ऋताचा प्राकृतिक सिद्धांत व शाश्वत असे ब्रह्म याविषयी विधायक दृष्टिकोन अनुसरला आहे. विश्वातील सौंदर्य व भव्यता यांत त्यांना ईश्वराची प्रत्यक्ष प्रचिती दिसते. मानवी मनातील रसरसलेले प्रेम व समर्पण यांचा प्रत्यय आल्याने तो नितांत सुंदर काव्यात व्यक्त करतात. ह्रदयांत उसळणारा आनंद व जीवनातील प्रसन्नता यातून वेदांतील काव्याची निर्मिती झाली आहे. जगण्याची हौस, कार्याचा उत्साह व त्यासाठी ईश्वराच्या पाठिंब्याची व स्फूर्तीची अपेक्षा येथे सर्वच प्रतिध्वनित झाली आहे. पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या धनासाठी व सुखासाठी व दीर्घकाळ जगण्याच्या अत्यानंदाने जगण्याच्या ईर्षेमुळे त्यांनी मनमोकळ्या प्रार्थना केल्या आहेत. मात्र या मंत्रद्रष्ट्यांनी स्वतः सत्य, ऋत व तप यांची बंधने घालून घेऊन शुचिव्रताची प्रतिज्ञा केली आहे. यामुळेच त्यांना परमेश्वरी स्फूर्ती व आत्मानंद प्राप्त होऊ शकला. 'वाक्' हा अंतरात्म्यांत अंतिम सत्याचा आविष्कार होय. अशा निष्ठेने त्यांनी त्याचा स्वीकार केला आहे.
बृहस्पते, नामातीताला नावे देऊन हे पहिले शब्द प्रकट केले त्या विशुद्ध उत्कृष्ट शब्दांनी त्यांच्या अंतरात्म्यातील दिव्य गूढता स्पष्ट झाली. चाळणीने पीठ चाळावे, त्याप्रमाणे त्यांच्या आत्म्यांनी हे शब्द सुलाखून त्यात लपलेले सौंदर्य मित्र मिजास ओळखतो त्याप्रमाणे पारखले.
विशुद्धता, प्रभाव व दिव्यता यामुळे वेदांतील सूक्ते ही खरोखर खडकातून उसळणाऱ्या स्वच्छ मधुर प्रवाहाप्रमाणे वाटतात. वेदांतच एक ऋचा आहे.

डोंगरातून उसळणाऱ्या आनंदी प्रवाहाप्रमाणे आमची गाणी बृहस्पतीच्या कानी गेली.
वेदाच्या भाषेचे मुख्य लक्षण हे आहे की अभिव्यक्ती अतिरिक्त परिमित आहे. अनेकदा ती इतकी तासलेली आहे की ती त्रोटक वाटते. ऐकणाऱ्याला वारंवार असे वाटते की कानावर जे पडते त्यापेक्षा आशय अधिक गंभीर आहे. जीवन व निसर्ग यांची सुंदर चित्रे काही दडलेला आशय साठवल्यासारखी वाटतात.वेदामध्ये गूढ सत्य स्पष्ट करण्यासाठी 'निहितं गुहा विः' असा शब्दप्रयोग वारंवार येतो. नुसता ध्वनीदेखील मनावर प्रतिकात्मक प्रभाव पाडतो. वेदातील ऋषींच्या वंशजापासून तो आजपर्यंत भारतात झालेल्या सुबुद्ध लोकांनी अत्यंत गंभीर आध्यात्मिक सत्याचा वेदात शोध घेतला व त्यांचे संशोधन केले आहे.
वेदातील जीवनाची व निसर्गाची दृश्ये काव्यगुणाच्या दृष्टीने बहुमोल आहेत. जगात इतरत्र कोठेही उषा व सूर्योदय यांची भव्यता व निसर्गातील शांती व माधुर्य यांना वेदांइतकी भावपूर्ण व विशुद्ध अभिव्यक्ती लाभली नाही. तसेच स्त्रीचे सौंदर्य अत्यंत हळुवारपणाने येथे रेखाटले आहे. अनातोली फ्रांसने म्हटले आहे की स्त्रीमुखावरील हास्य हे मानवी उत्क्रांतीचे एक पुढचे पाऊल आहे. वेद 'रुचिर सस्मित योषां' चे वर्णन करतात. तरुण युवतीचे रूप असलेल्या उषेचे हास्य त्यांना परिपूर्ण आदर्श वाटते. स्त्री पुरुषाचे प्रेम व मातृत्व याविषयी त्यांना सखोल व पवित्रयुक्त आदर वाटतो. जीवनातील लहान सहान गोष्टींना त्यांनी पावित्र्याचे लेणे देऊन जगणे हा जणू एक महान संस्कार ठरविला आहे.
जीवनाविषयी कुतूहलपूर्ण उत्साह त्यांना वाटत असला तरी त्याला समतोलपणाचा व वास्तव शक्यता व संभवनीयतेचा लगाम घातला आहे. नंतरच्या काळातील दंतकथा प्रसवणाऱ्या अतिरेकी कल्पनाविलासापासून जगातील हे प्राचीनतम वैदिक साहित्य फटकून राहिले आहे. पुराणांत मनुष्याचा जीवनकाल सहस्रावधी वर्षांचा वर्णिला आहे. पण वेदांनी 'शरदः शतम्' ची मर्यादा काटेकोरपणे पाळली आहे. त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमा देखील वास्तव जीवनाशी जवळीक ठेवतात.
वैदिक छंद अत्यंत नियमबद्धतेने गोवलेले असल्यामुळे त्यांचा प्रभावी गायन परिणाम होतो. ऋग्वेद हा अतिप्राचीन असूनही त्याचे छंद अधिक एकात्म आहेत ही गोष्ट सूचक आहे. येथे उत्क्रांतीचे तत्त्व उलटलेले दिसते. 'कस्मै देवाय हविषा विधेम' अथवा 'महेद्वानामसुरत्वमेकम् बृहद्वदेम विदथे सुवीरा' या सारख्या पालुपदांचा मनावर अपरिहार्य प्रभाव पडतो. साहित्यात अशी रचना सहज आढळत नाही. सामवेदात स्वतंत्र अशी ७५ सूक्ते असून इतर सूक्ते ऋग्वेदातील आहेत व त्या सर्वांना संगीतात बसवले आहे. यजुर्वेदात अनेक वाद्यांचा व संगीत साधनांचा उल्लेख आहे.
ध्वनींसाठी नगारा, उदात्ततेसाठी वीणा, काव्य आणि संगीतातील मूल्यांची इतकी सूक्ष्मता समजणारा समाज आपल्या आदिवासी बांधवांपेक्षा निश्चित उच्चस्तरीय असला पाहिजे. ऋग्वेदात म्हटले आहे.
वर्षानी एकाळाने तो वृद्ध होत नाही. महीने अथवा दिवस इंद्राला जरा आणीत नाहीत.
शेक्सपिअरला वेद माहीत नव्हते. नाहीतर त्याने जे म्हटले आहे 'वय तिला सुकवीत नाही. उपभोगाने ती शिळी होत नाही अशी तिची असीम भिन्नता आहे' हे त्याने वेदांतून घेतले आहे असे म्हणता आले असते. ध्वनीचा भर आणि अर्थावर भर यांचा संयोग तसेच प्रतिमा आणि माधुर्य यांची परिपूर्ण एकात्मता ही जर उच्च काव्याची लक्षणे असतील तर वेदातील उत्कृष्ट सूक्तांपेक्षा अधिक वास्तव अथवा उच्चतम काव्य आपणास कोठेही आढळणार नाही. उत्स्फूर्त अभिव्यक्ती, लयाचा प्रभाव व विस्तार आणि श्रोत्यांवर गंभीर व सूक्ष्म परिणाम या गुणांत शेक्सपिअर व मिल्टनशिवाय इंग्रजी वाङ्मयात वेदसदृश काव्य सापडत नाही. उदात्तता म्हणजे महान आत्म्याचा प्रतिनिधी असले तर वैदिक ऋषीचा आत्मा आदिमानवाच्या आत्म्याहून फारच वरिष्ठ मानावा लागेल. आपल्या काव्याच्या भवितव्याविषयी वैदिक ऋषींना पूर्ण निश्चिती वाटत होती हे आश्चर्यकारक आहे. दोन नद्या मानवी रूपाने एका ऋषीला म्हणतात, 'हे गायका, तुझे हे शब्द उत्तर काळात घुमत राहतील हे विसरू नकोस.' वेदाचे शब्द सहस्रावधी वर्षे घुमत राहीले आहेत आणि भविष्यकाळात कित्येक सहस्र वर्षे ते प्रतिध्वनीत होत राहतील अशी अपेक्षा आपणास करता येते.
२) वैदिक धर्माविषयी काही सत्येः
काही नास्तिक पंथ वगळल्यास भारतातील भिन्न काळातील सर्व धार्मिक पंथांनी वेदांचा सर्वोच्च अधिकार मान्य केला आहे. इतकेच नव्हे तर अत्यंत प्राचीन काळापासून गेल्या चार हजार वर्षांत वर्षात वेदांना अनमोल धार्मिक प्र्मा प्रमाण म्हणून स्वीकारण्यात आले आहे. मानवजातीच्या इतिहासात अतुलनीय अशा निष्ठेने व कष्टाने हे वेद केवळ मौखिक परंपरेने पिढ्यान् पिढ्या सांभाळले गेले आहेत. उपनिषदे अथवा भारत, रामायण अथवा संस्कृतातील इतर साहित्याकडे इतक्या निष्ठेने लक्ष पुरवले गेले नाही. तीन हजार वर्षात अनेक सामाजिक व राजकीय उलथापालथी होऊनही वैदिक धर्म आजवर अस्तित्वात राहीला हेच मोठे आश्चर्य आहे. वैदिक धर्मातील आंतरिक शक्तींची कल्पना तिच्यावर झालेल्या आक्रमणाचा व या धर्मावर झालेला त्याच्या परिणामांचा विचार करूनच येणार आहे. पुढील आक्रमणे विशेष महत्त्वाची आहेत.
ख्रिस्तपूर्व ६ व्या शतकात निघालेल्या वेद प्रामाण्य झुगारून देणारा बुद्धपंथाचा आघात हा पहिला मोठा आघात होय. यज्ञ, याग आणि तत्त्वज्ञान यांचा त्याग करून त्या पंथाने अर्ध्याअधिक भारताला त्या धर्माचे संकुचित, नैतिक स्वरुप मान्य करावयास लावले. तथापि काही शतकांतच भारताने या पंथाला मूळ धर्मात सामावून घेतले व बुद्ध धर्म म्हणून स्वतंत्र अस्तित्व त्या पंथाला या देशात उरले नाही. मग असे करताना बुद्ध धर्मातील काही आकर्षक विशेष जसे मूर्तिपूजा, देवळे व अहिंसेसारखी नैतिक तत्त्वे वैदिक धर्मियांनी अंगिकारली. वैदिक धर्माला हिंदुधर्म हे राष्ट्रीय नाव प्राप्त झाले व बुद्धाला नववा अवतार म्हणून मान्यता मिळाली.
अरब व्यापाऱ्यांना मलबारातील हिंदू राजांनी प्राचीन काळी स्थायिक होऊ दिले व त्यांच्याबरोबर इस्लामधर्म भारतात आला. अरबांनी आठव्या शतकात सिंध जिंकला पण त्यांना पुढे प्रगती करता आली नाही. अकराव्या शतकात पठाणी मुस्लिम आक्रमक भारतात आले व भारताचा फार मोठा भाग मुस्लीम अधिकारात जाऊन मुसलमानांचे अधिराज्य ५०० वर्षे अप्रतिहत टिकले. इराण, इराक, तुर्की, आफ्रिका, इजिप्त, मध्य आशिया व अफगाणिस्तान जिंकून तेथील प्रत्येक मनुष्यास मुस्लीम नेत्यांनी मुसलमानी धर्माची दिक्षा दिली. पण त्या मुसलमानी अधिसत्तेचा हिंदू धर्मावर फारसा परिणाम झाला नाही आणि पाच शतके अधिराज्य असूनही मुसलमानांची संख्या चतुर्थांशापलिकडे जाऊ शकली नाही. इस्लामच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक दडपणाविरुद्ध हिंदूंनी स्वतःचे रक्षण केले हा खरोखर एक चमत्कार आहे. जुने साहित्य नष्ट केले जात असताही मौखिक परंपरेने वेदांचे रक्षण झाले.

शैव व वैष्णव अशा दोन्ही पंथाचे संत निर्माण झाले. या संतांनी भक्तीच्या मार्गानी जनह्रदयांत स्थान मिळवले. भयानक पराजय व नाश होत असतांही हिंदू महिलांनी आपल्या निष्ठेने धन्यता प्राप्त करून घेतली.
ख्रिश्चन धर्माच्या संस्थापकाच्या मृत्युनंतर त्या धर्माच्या प्रचारकांनी युरोपमध्ये कार्यप्रवण होऊन ख्रिश्चन धर्माने संपूर्णपणे जुन्या धर्माचा समूळ नाश केला. ओडिनची पूजा, डुइड पंथ तसेच ग्रीक व रोमन देवतागण सर्वत्र निःशेष झाले. पहिल्या शतकात थॉमस नावाचा ख्रिस्तशिष्य भारतात आला व त्याने केरळात धर्म प्रचार केला. पण दोन हजार वर्षात या धर्माने फारशी प्रगती केले केली नाही. केरळात काही गट ख्रिश्चन म्हणून ओळखले जात. सोळाव्या शतकात पोर्तुगिज भारतात आले व त्याजबरोबर हा धर्म पुन्हा भारतात आक्रमकतेने शिरला. स्पेन व पोर्तुगाल लोकांनी सारी अमेरिका तेथील लाल इंडीयन व फिलीपाईन बेटे ख्रिश्चन केली. पोर्तुगीजांनी धार्मिक शासन वापरूनही ते गोव्यासारख्या लहान प्रदेशास पूर्णपणे ख्रिश्चन करू शकले नाहीत. तिसरी ख्रिस्ती लाट ब्रिटीशांचे वर्चस्व भारतात प्रस्थापित झाल्यावर मिशनर्यांच्या रूपाने आली. आता ही स्पर्धा असमान पक्षात सुरु झाली. कारण युरोपीय शस्त्रे व राजकीय सत्ता मिशनर्यांच्या पाठिशी होती, उलट हिंदू अडाणी व त्यांचे कोणी नेतेही सुबुद्ध नव्हते.
आरंभी हिंदू धर्माला काही धक्के बसले. थोड्या पाश्चिमात्त्य बनलेल्या सुशिक्षितांनी आपल्या पूर्वजांचा धर्म सोडला. परंतु एक अनपेक्षित व बलवान प्रतिक्रिया झाली. हिंदूधर्मात महान नेते उदयास आले व त्यांनी हिंदूंच्या पूजनीय प्राचीनत्वाविषयी व महान परंपरेविषयी आपल्या अनुयायांमध्ये अभिमान निर्माण केला. या धर्माचे जगातील विशिष्ट स्थानही स्पष्ट केले. त्यामुळे ख्रिस्ती प्रचारकांना आपले कार्य अगदी मागासलेल्या आदिवासी व अस्पृष्यांपुरते मर्यादित करावे लागले. या वेळी त्यांनी बरेच धर्मांतर करविले व त्यासाठी केवळ धार्मिक साधनेच वापरली असे नाही तथापि ख्रिस्त्यांची लोकसंख्या अरब राष्ट्रांच्या लोकसंख्येच्या शेकडा दोन इतकीच होती. तुलना म्हणून हे सांगावेसे वाटते की चीन व जपानमध्ये सुशिक्षितांमध्ये धर्मांतराचे प्रमाण भारतापेक्षा बरेच अधिक आहे. अतिशय कठोर आक्रमणे व आघात होऊनही हिंदू धर्म गेले चार हजार वर्षे अधिकाधिक जिवंतपणाने उत्कर्ष करील राहीला आहे. भविष्यातील अजेयपणा यावरून सिद्ध होतो असे नाही. मात्र प्रत्येक हिंदूने आपले हे पैत्रक धन सांभाळण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. यासाठी हे सबळ प्रोत्साहन आहे.

हिंदूंची उदारता -
परकीय आक्रमणांपासून हिंदूंनी आपले रक्षण कसे केले याचा विचार करीत असता हिंदूंनी आपल्या विजयाच्या काळात जे लोक पराजित झाले त्यांच्याशी हिंदू कसे उदारतेने वागले याचेही स्मरण केले पाहिजे. ख्रिस्त्यांनी ज्याप्रमाणे धार्मिक न्यायासने स्थापून ख्रिस्तेतरांचा जो अनन्वित छळ केला त्याप्रमाणे हिंदूंनी बौद्धांची हत्या केली अथवा नास्तिकांना देशाबाहेर घालविले याचा यत्किंचितही ऐतिहासिक पुरावा नाही. उलट धार्मिक समभावाचा सुस्पष्ट पुरावा उपलब्ध आहे. उदाहरणार्थ वेरूळ येथील लेणी ब्राह्मणी म्हणजे हिंदू, बौद्ध व जैन अशी सर्व एका रांगेत असून सामान्य प्रेक्षक एक पंथ कोठे संपला व दुसरा कोठे आरंभला हे ओळखू शकत नाही. खजुराहो येथे हिंदू व जैन मंदिरे शेजारी उभी आहेत. भारतातील ज्या भागात हिंदूंनी मुसलमानांच्या अधिकारांतील प्रदेश जिंकला तेथे कोणाही मुसलमानास बळाने धर्मांतर करावयास लावल्याचे उदाहरण नाही. खरे तर हिंदू परधर्मीयांस आपणात समाविष्ट करून घेतच नव्हते. जिझीयासारखा करही मुसलमानांवर लादला नाही. इतकेच काय जी हिंदू मंदिरे मशिदी बनविली होती ती परत घेण्यात आली नाहीत. जेत्यांना फार सभ्यतेने वागविण्यात आल्याची उदाहरणे आहेत. स्पेनमध्ये मुसलमानांचे ८०० वर्षे राज्य होते. स्पॅनिश लोकांनी जेव्हा स्वदेश परत मिळवला तेव्हा त्यांनी मुसलमानांना धार्मिक न्यायासनाद्वारे वा इतर मार्गांनी भरपूर छळले व शेवटी देश सोडून जाण्यासाठी तीन दिवस दिले. या घटनेशी तुलना करता हिंदूंची उदारता उठून दिसते. इतर देशात धार्मिक छळ आरंभल्यानंतर आश्रयार्थी भारतात आले. त्यांचे स्वागत करण्यात आले. पहिल्या शतकात ज्यू, सहाव्यात पारशी तर आधुनिक काळात तिबेटी बौद्ध आले. धार्मिक क्षेत्रात व बळाचा पूर्ण अभाव व धार्मिक सभ्यता व सहिष्णुता यामुळे हिंदूंना एक नैतिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
धर्मांतरितातील हिंदू मनोवृत्ती - हिंदुधर्मातून परधर्मात गेलेले लोक इतर देशातील धर्मांतरितांपेक्षा अधिक सहिष्णू दिसतात. उदाहरणार्थ केरळातील सीरियन ख्रिस्त्यांनी अथवा गोमांतकातील रोमन कॅथलिकांनी ख्रिस्तेतरांना छळल्याची उदाहरणे नाहीत. अथवा तेथे धार्मिक यादवीही झालेली नाही. तसेच भारतातील मुसलमान येथील हिंदूंबरोबर मित्रत्वाने वागले आहेत व समाजातील एक घटक म्हणून वावरले आहेत. भारत व चीनबाहेर हिंदू व मुसलमानांचा हा एकोपा कोठेही दिसत नाही. चित्रकलेला इस्लामचा विरोध असताही व्यक्ती चित्रांमध्ये अनेक मुस्लिम चित्रकार प्रसिद्ध झाले. सारांश हिंदूंनी आपला धर्म सोडला तरी आपल्या नव्या धर्मात आपली जुनी संस्कृती अंतर्भूत केली. जगाच्या धार्मिक इतिहासात वरील घटनेवरून हिंदूंचा इतिहास हा अद्वितीयच म्हणावा लागेल. मध्ययुगात अथवा आधुनिक काळातही हिंदूंचे धर्मांतर झाले ते बहुतेक बळाने झाले अथवा आर्थिक दडपणाने किंवा आर्थिक प्रलोभनाने झाले असेच दिसून येते. याहून अधिक प्रभावी कारण हिंदूंचे स्वधर्माविषयीचे अज्ञान हेच होय. धार्मिक नेत्यांनी आपले धर्मशास्त्र शिकवण्याचे कर्तव्य पार पाडले नाही. तसेच अस्पृश्यतेसारखी बंधनेही विघातक ठरली. सिंध, काश्मीर व पूर्व बंगालमधील सामुदायिक धर्मांतर हे धार्मिक नेत्यांच्या अभावामुळे घडले. तेथे रामानंद, चैतन्य, नानक, नामदेव, तुकाराम यासारखे संत मिळाले असते तर बहुजनांनी आपला धर्म सोडला नसता. भारताच्या या सीमेवरील प्रदेशात जे घडले तेच मलाया, इंडोनेशियात घडले. ख्रिश्चन धर्माने भारतात अपेक्षेप्रमाणे प्रगती केली नाही याचे श्रेय आधुनिक समाजसुधारक संस्थानी सामान्य जनतेत जो हिंदू धर्माच्या विशुद्ध व उच्च ज्ञानाचा प्रसार केला त्यास दिले पाहिजे. हिंदुधर्माचे ज्ञान जेथे पसरले तेथे धर्मांतरांमध्ये हिंदू धर्मात परतण्याची आकांक्षा उत्पन्न झाल्याचे आढळून आले आहे. हिंदूंनी आपली दारे पुनरागतांसाठीही बंद ठेवल्याने आपल्या धर्मात परतणेही धर्मांतरितांस अशक्य झाले. काही अनधिकृत संस्थांनी ही द्वारे उघडी करताच सहस्त्रावधी लोक हिंदू धर्मात परतण्यास गर्दी करू लागले आहेत. हिंदू धर्माचा सजीवपणा व मोहिनी यांचा हा बोलका पुरावा आहे. इतरत्र मुळच्या धर्मात परतण्याचे असे सामुदायिक आंदोलन आढळत नाही. ख्रिस्ती झालेले ज्यू, ख्रिस्ती झालेले मुळचे ग्रीक देवतापूजक, ख्रिस्ती झालेले स्पेनमधील मुसलमान अथवा बळाने बाटविलेले इतर धर्मीय धर्मीय यांनी आपल्या मूळ धर्माची तळमळ दाखविली नाही. पण भारतात मात्र लक्षावधी बौद्ध हिंदू धर्मात परतले व आधुनिक काळात मुसलमान व ख्रिश्चन परतत आहेत. ब्रिटिश भारतात या चळवळीस खीळ घालण्यासाठी राजकीय, शासकीय व परकीय व्यावहारिक उपाय योजले गेले. स्वामी श्रध्दानंदांना तर शुद्धी कार्यामध्ये आपल्या जिवाचे मोल द्यावे लागले. वास्तविक कोणतेही अवैध उपाय अनुसरल्याचा त्याजवर कोणीही आरोप करू शकले नव्हते.
हिंदूधर्माच्या या मोहिनीचे कोणते कारण असावे? वेदांसारख्या मूळ ग्रंथात जी अविनाशी सत्ये ग्रथित आहेत व त्यांचा अजेय उत्साह तसेच त्यांनी सांगितलेला उच्च नैतिक अध्यात्मिक आदर्श समोर ठेवून पिढ्यान् पिढ्या आदर्श जीवन जगलेले ऋषी, संत व राज्यकर्ते तसेच शूरवीर व सामान्यजन हे याच्या मुळांशी असावेत. हे खरे आहे की अनेक शतकांत वैदिक धर्माने विस्तृत प्रमाणावर व्यंगे व न्यूने साठवली तरी हे ही खरे आहे की काळाच्या गतीनुसार आवश्यक त्या जुळवणूकीही करण्यात आल्या होत्या. जीवनाचा व शीलाचा आध्यात्मिक आदर्श इतका उच्च इतरत्र कोठेही नव्हता. तसेच या आदर्शाशी आचाराचा संयोग इतका निकट इतरत्र दिसत नाही. हे आदर्श चिकाटीने व प्रामाणिकपणाने अनुसरले गेले नाहीत हाच हिंदुधर्माचा दुबळेपणा होय. तसेच सामाजिक आदर्शांकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. जातपात व अस्पृश्यता हे तर अडथळे ठरले आहेत. असंघटित व दुर्लक्षित वैदिक धर्माने इतिहासावर येवढा प्रभाव पाडला आहे यावरून आपल्या उच्च आदर्शांशी व आकांक्षांशी अधिक सत्यनिष्ठ व प्रामाणिक असा वैदिक धर्म मनुष्यजातीसाठी केवढे प्रचंड कार्य करू शकेल?
३) पुरातत्त्वज्ञांनी वेदांचा अभ्यास भाषाशास्त्र, मानववंशशास्त्र व समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून केला आहे. कोट्यावधी लोक जो धर्म सहस्त्रावधी वर्षे पाळत आले आहेत त्या धर्माचा वेद हे आधार आहेत. या गोष्टीकडे मात्र पुरेसे लक्ष दिले गेले नाही. वेदांचा खराखुरा धार्मिक अभ्यास करण्यांत अनेक अडचणी आहेत सायन भाष्य हे बहुमोल असले तरी त्याचा एक दोष आहे की धर्माविषयी बोलताना ते आपल्या काळातील परिभाषेत बोलतात व म्हणून ते असामायिक ठरतात. काही पुरातत्त्ववेत्त्यांनी महान कार्य करून वेदांचा अर्थ लावण्याच्या नव्या पद्धती शोधून काढल्या. मात्र त्यांचे भाष्य स्वीकारताना त्यांचे पूर्वग्रह प्रतिकूल असण्याचा संभव लक्षात घेतला पाहिजे. त्यांच्यापैकी बहुतेक भाविक ख्रिश्चन होते. खऱ्या देवाची उपासना ख्रिस्त्यांपुरती मर्यादित असून ख्रिस्तेतर कोणत्याही नावाने उपासना करीत असले तरी ते ईश्वराची उपासना करीन नसून इतर कोणाची तरी करीत होते अशी त्यांची श्रद्धा असे.
पापाची जाणीव व गोणपाट परिधान करून पश्चात्ताप व्यक्त करणे हा ख्रिस्त्यांनी धार्मिकतेचा मार्ग मानला आहे. अशांना वेदातील आनंदमय वृत्ती ही अधार्मिक वाटणे साहजिकच होते. ख्रिस्ती धर्माने दुष्टाला शरण जाणे, एका गालांत दिली असता दुसरा गाल पुढे करणे, शत्रूवर प्रेम करणे या नैतिक तत्त्वाला लोकप्रिय बनवले होते. ही नीतीची पराकाष्ठा मानली जात असे. या नैतिक आदर्शापासून मनुष्य जितका दूर जाईल तितका तो अधिक अधःपतित समजला जाई. वीरत्वाचा आदर्श हे वैदिक नीतीचे मूळ आहे. दुष्टांशी कसलीही तडजोड नाही त्याला पराकाष्ठेचा संकोचरहित प्रतिकार केलाच पाहिजे ही वेदांची शिकवण. इंद्र ही सर्वश्रेष्ठ देवता या आदर्शाचे प्रतीक आहे. आतां वीरत्वाशी निगडित असलेला त्वेष व संताप हा रानटी जीवनाचा छाप आहे असे ख्रिस्ती समजतो. 'उच्चतम नीती'ला मानणारा खरा ख्रिस्ती इंद्राच्या पराक्रमाच्या गौरवासाठी वेदातील अनेक भव्य सूक्ते अवतरली असली तरी त्याला अनुकूलता दर्शविण्यास आपल्या मनाला वळवू शकत नाही.
उलट 'तो पाप्यांना आपल्या पाशांत पकडतो व त्याचे दूत पृथ्वीवर सर्वत्र फिरत असतात.' असे ज्याचे वर्णन आहे त्या वरुणाला नैतिक देवता किंबहुना परमेश्वर मानण्यापर्यंत काही ख्रिस्ती पुरातत्त्ववेत्ते पुढारलेले आहेत. पुरातत्त्वज्ञांचे धार्मिक पूर्वग्रह हर्बट स्पेंसरने लोकप्रिय केलेल्या सामाजिक उत्क्रांतीच्या तत्त्वामुळे परिपुष्ट झाले. वास्तविक डार्विनचा सिद्धांत हा प्राण्यांपुरता मर्यादित आहे. स्पेंसरचा प्रगती सिद्धांत असे सांगतो की काळावरोबर मनुष्य समाज प्रगती करीत असतो. अर्थात प्रस्तुत काळापासून जितके भूतकाळात जावे तितका तो समाज अप्रगत असलाच पाहिजे. अर्थात वेद प्राचीनतम असल्यामुळे त्यावेळची संस्कृती हीनतम असलीच पाहिजे. आता हा सिद्धांत खोटा ठरला आहे. उलट असे सिद्ध झाले आहे की अध्यात्म व कला यांत कित्येक शतकांत प्रगती झालीच नाही तरी देखील पुरातत्त्वज्ञांच्या मतात सुधारणा झाली नाही.
१९वे शतक हे विज्ञानाचे शतक असल्यामुळे व पुरातत्वज्ञांना मुख्यतः भाषाभ्यास व मानववंशशास्त्रात रस असल्यामुळे साहित्यातील शब्दांचे मूळ शोधण्याचा प्रघात पडला. ज्या शब्दांचा अर्थ परिचित होता त्यांच्यापुरता हा प्रघात योग्य होता. परंतु अपरिचित शब्दांचे खरे वा काल्पनिक मूळ शोधून त्याचा अर्थ शोधला जाऊ लागला तेव्हा धर्मातील आग्रहापेक्षाही हटवादी आग्रह उघड होऊ लागला. तसेच मानववंशशास्त्राच्या उपयोगाचे झाले. जीवनाच्या अंगांचें स्पष्टीकरण त्याच्या उगमाविषयी विकृत अशा सिद्धांतानी केले जाऊ लागले. काही पुराणपंडितांनी या क्षेत्रात वैध सीमा ओलांडून मनःपूत लेखणी चालवली. वेद हे पुरातन आहेत हे मानल्यानंतर आदिमानव काव्य या दृष्टीने त्यातील दोषांचा आविष्कार करण्याकरता आपले पांडित्य पाघळले आहे. उदा. कॉवेल म्हणतो "संस्कृतीच्या प्राचीन काळातील कवनामध्ये ज्या गुणाची आपण सहज अपेक्षा करतो म्हणजे साधेपणा, नैसर्गिक करुणा व उदात्तता त्यांचा वैदिक काव्यात आश्चर्यकारक अभाव आहे. बहुतेक वैदिक सूक्तांची भाषा व शैली निवडून पडेल इतकी कृत्रिम आहे. “ ह्या टीकाकाराला करुणा, साधेपणा न आढळल्याने त्याची निराशा झाली आहे. त्याला ही गोष्ट सुचली नाही की ऋग्वेद प्राचीन असला तरी त्याकाळी संस्कृती पुष्कळच प्रगत व उच्च प्रतीची असू शकेल. भारतीय इतिहासकारांनी देखील स्पेन्सर प्रणित प्रगतीवादाचाच अनुवाद केला आहे. मात्र आता नवा ध्वनी उमटू लागला आहे. डॉ. राधाकमल मुकर्जी म्हणतात "तारतम्याने जाणावयाचा पहिला मुद्दा हा आहे की वेदवेत्यांतही अति प्राचीन ऋग्वेद संस्कृतीचा आरंभच दाखवीत नसून तो संस्कृतीचा अत्युच्च बिंदू दाखवतो. ऋग्वेद हा भारताचा तसाच जगाचा पहिला ग्रंथ आहे पण त्यात भारतीय विचारांचा उच्चतम कळसच दिसून येतो. मानवाच्या सुबुद्धतेचे शिखरच ते आहे. आरंभापासून परिपूर्णतेपर्यंतची उत्क्रांतीची प्रक्रिया आपणास त्यात दिसते.” शेवटली गोष्ट म्हणजे हे पुरातत्त्व आपले विचार अबाधित समजतात. त्यांनी काढलेले निष्कर्ष संशयातीत आहेत अशी त्यांची मनोवृत्ती आहे. या पाश्चिमात्य अभ्यासकांची दृष्टी सांप्रतच्या भारतीयांच्या मागासलेल्या अवस्थेने व राजकीय दास्यत्वामुळे भारतीयांच्या या महान पूर्वजांविषयी कलुषित झाली होती असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
कोट्यावधी मानवांच्या जीवनांवर परिणाम करणाऱ्या एका महान धर्माचा वेद हा पाया आहे हे समजून घेतांना या पाश्चात्यांच्या मतांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. त्यांनी केलेल्या संशोधनाचे महत्त्व विसरता येणार नाही पण त्यांचे पूर्वग्रह लक्षांत घेतले पाहिजे. धार्मिक विचारांच्या ओघासंबंधी भारतीय सच्च्या विद्वानांची मते दुर्लक्षिता येणार नाहीत. नंतरचे वेद, तसेच उपनिषदे, बुद्ध पंथ, भागवत पंथ, योग इ. घटकही वेदांवर प्रकाश पाडू शकतील. त्यांचा वेदांशी मतभेद असला तरी देखील वेदांचा अर्थ लावताना त्यांचा उपयोग होऊ शकेल. त्याच प्रमाणे परंपरागत वैदिक पांडित्यही हातभार लावू शकेल.
४) वैदिक ईश्वरवादः
एकेश्वरवाद व अनेकेश्वरवाद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पंथांपेक्षा वेदातील ईश्वरवादाविषयीचा विचार हा अध्यात्माच्या द्दष्टीने अधिक सूक्ष्म आहे. मॅक्समुल्लरने त्या पंथांपेक्षा वेदांचे वेगळेपण दाखविण्यासाठी हेनोथीइजम हा शब्द बनविला. त्याचा अर्थ परमेश्वरवाद असा आहे. वेदांतील ईश्वरवादाची पूर्ण कल्पना ज्यांत येईल अशी त्या शब्दाची व्याख्या त्याने केली नाही. आम्ही त्या शब्दाचा अर्थ वाढवून दुसरा शब्द नसल्याने तो शब्द वापरणार आहो. त्याचा विचार करण्यापूर्वी एकेश्वरवाद व अनेकेश्वरवाद या पंथांचा विचार उपयुक्त ठरेल. तत्त्वज्ञानाच्या द्दष्टीने याचा अर्थ केवळ एक ईश्वर मानणे व अनेक ईश्वर मानणे एवढाच होतो. व्यवहारात मात्र याचा अर्थ अधिक व्यापक आहे. अनेकेश्वरवादापेक्षा एकेश्वरवाद हा वरिष्ठ आहे असे सामान्यतः समजतात. प्रगती सिद्धांताप्रमाणे अनेकेश्वरवाद प्रगत होऊन एकेश्वरवादात परिणत झाला असेही सांगण्यात येते. सूक्ष्मपणे विचार केल्यास एकेश्वरवादाच्या वरिष्ठतेचा आधार ज्या गृहितकांवर आहे ती गृहिते सर्वांस मान्य होण्यासारखी नाहीत असे आढळून येते. त्याच्यातील भेद पूर्णतेच्या मात्रेचा केवळ नसून ते दोन भिन्न विचार व भिन्न पद्धती आहेत. एकेश्वरवादाचे लक्षणीय विशेष प्रथम विचारात घेऊ या. प्रथम एकेश्वरवाद म्हणजे एका दैवी व्यक्तिवर श्रद्धा होय. काहींच्या मते एकपणा हाच महत्त्वाचा आहे. पण केवळ तसे नाही. उदाहरणार्थ अशरीर, निराकार ब्रह्म म्हणजे एकेश्वरवाद मानणे चुकीचे आहे. 'एकम् सद् विप्राः बहुधा वदंति' या ऋग्वेदातील सुप्रसिद्ध ऋचेतील 'एकम् सत्' नपुसकलिंगी आहे ते दैवी व्यक्ती नाही. एकेश्वरवादी पंथांनी शूद्र ब्रह्माची कल्पना केलेली नाही. त्यांचा ईश्वर हा दैवी व्यक्ती आहे तसेच मनास आवडेल त्याप्रमाणे माता, कुमारी, भाऊ इत्यादी जिव्हाळ्याच्या नात्याच्या व्यक्तीचीही येथे सोय नाही. एकेश्वरवाद्यांचा ईश्वर हा एक दैवी व्यक्तीच नाही तो पुरुष आहे. एकेश्वरवाद व अनेकेश्वरवादाचा भेद केवळ संख्येचा नसून तो लिंगाचाही आहे. तसेच हा पुरुष बालक अथवा भाऊ असून चालत नाही तो पिता आहे व वयोवृद्ध आहे पुढील ऋचेत अग्नीला ईश्वर मानले आहे व म्हटले आहे "अग्नीला मी माझा पिता, माझा आप्त, माझा बंधू व सदैव माझा मित्र मानतो.” हा वृद्धपिता गृहपती म्हणजे राजा आहे व तो वाटेल तेथे वास्तव्य करीत नसून तो स्वर्गातच आपला राजप्रासाद व राजसभा ठेवतो.
अनेकेश्वरवादी आपले देव सृष्टीभर वास्तव्य करतात असे समजतात. या साऱ्या विशेषांमुळे धर्म व जीवनाच्या कल्पनेत मुलभूत अंतर उत्पन्न होते. एकेश्वरवादाच्या दृष्टीने स्वर्ग हा अस्तित्वाची उच्च पातळी असून तेथे ईश्वर व त्यांचे देवदूत यांचेच काय ते वास्तव्य असू शकते. अर्थात स्वर्ग पवित्र आहे व सृष्टी अपवित्र आहे. स्वर्गाचे रहिवासी पवित्र आहेत. सृष्टिवासी पापी आहेत. ईश्वर श्रेष्ठ आहे, मानव तुच्छ आहे.
अनेकेश्वरवादाच्या देवता सृष्टीत सर्वत्र असतात आणि पवित्र व अपवित्र, मानवी व दैवी, मर्त्य व अमर यामधील भेदरेषा फारच सूक्ष्म बनते. त्यांच्यामते स्वर्ग पृथ्वीवर असतो व ईश्वर हा निसर्गात व मानवांत असतो. अनेकेश्वरवाद हा पृथ्वीशी, जीवनाशी व जीवनातील आनंदाशी निगडित आहे. उलट एकेश्वरवाद हा ऐहिक वस्तूंना तुच्छ मानून स्वर्ग व मरणोत्तर जीवनाशी संबंद्ध असतो. अनेकेश्वरवादाच्या ह्या विशेषाला निसर्गवाद असेही म्हटले आहे. एकेश्वरवादी ईश्वराला बापच समजत नाहीत, ते त्याला राज्यकर्ता, सम्राट मानतात. हा वाद अर्थातच साम्राज्यवादी आहे. स्वर्गातून ईश्वर सर्व सृष्टीवर एकाधिकाराने राज्य करतो. त्याचे दूत आहेत व त्याचे त्याचे उपराजे तो नियुक्त करतो. त्याच्या प्रजेमध्ये जे उत्कृष्ट असतील त्यांना तो स्वर्गात घेतो व इतरांना नरकाच्या अंधाऱ्या बंदिवासात लोटून देतो. आपल्या प्रजाजनांकडून तो एकनिष्ठतेची अपेक्षा करतो. त्यांनी नियमित, वारंवार ईश्वराविषयी आपली निष्ठा व्यक्त केली पाहिजे. त्यांनी ईश्वराची भीती बाळगून त्याच्यापुढे वाकले पाहिजे व अभिवादन केले पाहिजे. उपटसुंभे व प्रतिस्पर्धी यांची त्याला घृणा आहे. ईश्वराशिवाय इतरांविषयी निष्ठा दाखविणे हा द्रोह होय. साहजिकच स्वर्गातील ईश्वराखेरीज इतरांची उपासना करणारास शिक्षा करणे हे ईश्वरास प्रसन्न करण्याचे एक प्रभावी साधन होय असे त्याचे प्रजानन मानूं लागले. या एकेश्वरवादाला एक कट्टर विरोधकही मानला गेला आहे. त्याला सैतान म्हणतात. माणसे सैतानास शरण जाण्याचा कट्टर धोका असू शकतो. कारण सैतान सृष्टीवर अधिकार प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. जी माणसे सैतानाशी मनाने का होईना आधीन असण्याचा संशय असेल त्यावर ईश्वराचा तात्काळ कोप होतो. ईश्वर हा एकाधिकारी समर सम्राट असल्याने त्याची इच्छा अथवा आज्ञा जपणे हे महत्त्वाचे असते. कारण पृथ्वीवरील मनुष्याचे जीवन या इच्छेप्रमाणे चालले पाहिजे.
साहजिकच आपली इच्छा मानवापर्यंत पोचती करण्यासाठी त्याला प्रेषित पाठवावे लागतात जे लोक त्याच्या इच्छेपुढे मान तुकवितात व ती इच्छा पृथ्वीवर प्रभावित करतात ते पुण्यवान होत व जे त्या इच्छेचा म्हणजेच प्रेषितांनी आणलेल्या इच्छेचा अवमान करतात ते पापी होत, अशा रितीने ईश्वराची इच्छा पाळण्यास आपल्या इच्छाशक्तीला भाग पाडण्याची प्रक्रिया म्हणजेच धर्म होय. अडचण येवढीच की या प्रेषितांना पृथ्वीवर सर्वत्र मान्यता प्राप्त नसते. परिणाम हा की एकेश्वरवादी भिन्न भिन्न पंथ स्वतःचा परमेश्वराशी निगडितपणा बजावून दुसर्‍यांशी स्पर्धा व वैर करतात.
अनेकेश्वरवाद – एकेश्वरवादांतील स्वर्गातील एका ईश्वराच्या ठिकाणी अनेकेश्वरवाद अनेक देवांची कल्पना करतो. देवतांच्या समूहावर त्यांची श्रद्धा असून प्रत्येक देवता ही स्वतंत्र प्रकृती, स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची असून लिंग, वय व गुणांनी दुसऱ्या देवतांहून निराळी असते. एकेश्वरवादातील एका राज्यकर्त्या सम्राटाच्या ठिकाणी येथे देवतांचा समूह राज्यकर्ता असतो. एका देवतेचा कोप घालविण्यासाठी दुसरीला आवाहन करता येते व एकातील दुर्गुण दुसरीतील सद्गुणांनी दाबले जातात. एकेश्वरवादात एकेश्वरावर श्रद्धा न ठेवली तर तो ईशद्रोह ठरतो. अनेकेश्वरवादात एकदेवतेस सोडून दुसरीची उपासना वैध मानली जाते. अनेकेश्वरवादी नास्तिक असतच नाही तो अधिक चांगला अथवा अधिक उपकारक देव शोधण्यास मोकळा असतो.
इजिप्त, ग्रीस व रोम मधील अनेकेश्वर पद्धती अशी आहे आणि आमच्या पुराणांतील पद्धती थोड्या अंतराने अशीच आहे. भारतातील अनेकेश्वरवाद एका विशिष्ठ पातळीनंतर ईश्वरतेमध्ये विलीन होतो. येथे उपासक या अथवा त्या देवतेचा विचार न करता सूक्तात अंतर्भूत असलेला असलेल्या दैवी अस्तित्वाचा काव्यमय साक्षात्कार मिळवितो.
अनेकेश्वरवाद हा काव्यात्म ईश्वरवाद आहे. ईश्वराची उपासना काव्यात केली जाऊन प्रतिमा, रंग, अत्युत्कट मानवी भावनांचा उपयोग करून काव्यानंद प्राप्त करण्यात येतो. अर्थातच सौंदर्य कल्पना ही मूलगामी म्हणून स्विकारली जाते. एकेश्वरवादात सम्राट ईश्वराची युद्धे लढण्यासाठी सैनिक प्रकृती व धर्मयुद्ध आवश्यक असते. अनेकेश्वरवादात कवी व लेखक महत्त्वाचा असतो. जनतेवर प्रभाव पाडण्यासाठी अनेकेश्वरवादात समारंभावर भर देण्यात येतो.
काव्य, गायन, कला व स्थापत्य या सर्वांच्या द्वारे श्रद्धेची जोपासना केली जाते. एकेश्वरवादात कलेचा निषेध असतो व केंद्रीय सत्ता बलवान करण्याकडे लक्ष पुरवले जाते. अनेकेश्वरवादाचा प्रभाव अर्थातच स्वेच्छेचा, स्वयंस्फूर्तीचा असतो. एकेश्वरवादातील आग्रह व नियम पालन तेथे नसते. सारांश एकेश्वरवादात पालनावर भर असतो अनेकेश्वरवादात भिन्नताच अधिक असते. कोणत्याही राष्ट्राचा अनेकेश्वरवाद हा राष्ट्रधर्म होऊ शकला नाही. उलट एकेश्वरवाद हा राष्ट्राच्या आधारावर टिकू शकतो. अनेकेश्वरवाद काही व्यक्तींच्या उपक्रमाने व प्रयत्नाने वाढीस लागला आहे. मध्यवर्ती सत्तेचा पाठिंबा नसल्याने अनेकेश्वरवादाला लोकांच्या आश्रयावरच जगता येते. साहजिकच काळानुसार त्याचे वाङ्मय काव्य व प्रतिमा पालटत जातात. अनेकेश्वरवाद हा सतत सृजनशील असावा लागतो. इजिप्त व बाबिलॉन ने सृजन टिकविले नाही म्हणून ते पंथ नष्ट झाले. ख्रिश्चन धर्माने ग्रीस व रोमन अनेकेश्वरवाद ग्रासून टाकला तेव्हा तो अत्यंत सृजनशील होता. या सृजनशीलतेने मध्ययुगात ख्रिस्ती धर्मामध्ये पुष्कळच रंग भरला व नंतर ग्रीक विद्यांनी तर स्वतंत्र विचारप्रणाली आणून ग्रीक परंपरा पुनरुज्जीवित केल्या. अशाप्रकारे अनेकेश्वरवाद हा त्याच्या लवचिकपणामुळे व परिवर्तनशीलतेमुळे अस्तित्वात राहीला आहे. एकेश्वरवादाचे बळ त्याच्या सिद्धांताच्या कठोरतेमध्ये व अचल धर्मनिष्ठेमध्ये असते. याचा परिणाम म्हणून धर्मलंड व परधर्मियांचा क्रूरपणे छळ व नाश करण्याची प्रवृत्ती वाढते. मॅथ्यू आरनाल्डने ज्यू धर्माविषयी म्हटले आहे की त्यात श्रद्धेचा कठोरपणा व काटेकोर सिद्धांत पालन असते, उलट ग्रीक देवतावादांत उत्स्फूर्त जाणीव व अभिव्यक्ती व साक्षात्काराचे स्वातंत्र्य असते. तेच एकेश्वर व अनेकेश्वरवादाला लागू आहे. विश्वाच्या सौंदर्याची कविमनावर प्रतिक्रिया होऊन कल्पनेला अभिव्यक्तीसाठी पूर्ण नाव मिळतो यामुळे अनेकेश्वरवादात प्रतिमा मग त्या सांकेतिक प्रातिनिधिक अथवा सूचक असो ते हे अभिव्यक्तीचे माध्यम बनते. एकेश्वरवादात सिद्धांतावर भर असतो, स्वर्ग आणि तेथील ईश्वर याविषयी निश्चित जाणीव असल्याने वास्तवावर भर दिला जातो. उदा. सृष्टीची उत्पत्तीची एक ऐतिहासिक घटना आहे तिचा काळ निश्चित आहे व ख्रिस्ताचा ईश्वरापासून जन्म व कुमारी मातृत्व यांस वास्तव मानले जाते. एकेश्वरवादातील एकाही घटनेचे सत्य मान्य न झाले तर सर्वच डोलारा कोसळतो. उलट एकेश्वरवाद वास्तवाचा अभिनिवेश दाखवीत नाही. साहजिकच सत्य व विज्ञानाशी त्याचा विरोध नाही. उदा. बायबलमध्ये सृष्टीच्या उत्पत्तीविषयी जे वर्णन आहे ते डार्विनच्या उत्क्रांतीवादाशी विसंगत आहे म्हणून ख्रिश्चन तो वाद मान्य करीत नाहीत. उलट पुराणात दिलेली सृष्टीच्या उत्पत्तीची माहिती शास्त्रीय आहे असे कोणीच मानत नाही म्हणून त्यांचा उत्क्रांतिवादाला विरोध नाही.
३) वेदांतील परमेश्वरवाद – अनेकातील एक वेदात जो धर्म सांगितला आहे त्या प्रकारची धर्मप्रवृत्ती निरनिराळ्या काळी आपणास आढळून येते. आर्य संस्कृतीच्या अध्यात्मिक आदर्शतेची ही अतिप्राचीन अभिव्यक्ती आहे. हिच्या अन्वये ईश्वर हा अनेकांतील एक आणि एकात अनेक असा कल्पिला आहे. ही कल्पना अंशतः मॅक्समुल्लरने बनविलेल्या 'हेनोथीइझम' या परिभाषेने व्यक्त होते. हेनोथेइझम म्हणजे परमेश्वरवाद हा एकेश्वरवाद मानतो म्हणजे ईश्वर एक आहे असे मानतो. त्याचे अनेकेश्वरवादाशी या दृष्टीने साम्य आहे की त्यात अनेक देवदेवतांचा नावाने उल्लेख येतो. मात्र परमेश्वरवादातील ईश्वर एकेश्वरवादातील ईश्वरापेक्षा फार वेगळा, अनेकेश्वरवादातील अनेक देवतांपेक्षा अगदी भिन्न आहे. परमेश्वरवादात अनेक नावाने ईश्वराला संबोधले असले तरी प्रत्येक सर्वश्रेष्ठ मानले आहे. उपासकाची उपासना पद्धती देवताचे नाव पालटले तरी अचलित राहते. मॅक्समुल्लरच्या कल्पनेपलीकडे वेद जातात. प्रथमतः वेदांनी स्पष्टपणे वारंवार सांगितले आहे की एकदेवता व दुसरी देवता अथवा एक व दुसऱ्या अनेक या एकच आहेत. दुसरी गोष्ट ही की सर्व देवता ह्या 'एकम् तत् सत्' ह्या नपुसकलिंगी ब्रह्मच आहेत. हे ही स्पष्ट व आग्रहाने सांगितले आहे. वैदिक ईश्वरवाद म्हणजे एकाची अनेक नावांनी व रूपगुणांनी केलेली उपासना होय. याला अद्वैत ईश्वरवाद म्हणता येईल. अद्वैत तत्त्वज्ञान हे ईश्वराचे एकत्व सांगत नसून अस्तित्वाच्या सर्व प्रकारांचे एकत्व सांगते. त्यापेक्षा अद्वैत ईश्वरवाद वेगळा आहे. उपासकाच्या दृष्टीने ईश्वर एक आहे. ईश्वराच्या साक्षात्काराने मन भारावून जी शरणाची प्रवृत्ती उद्भवते तिच्यातून वैदिक प्रार्थना निर्माण झाल्या आहेत. साक्षात्काराचे रूप पालटले तरी प्रवृत्ती सतत तीच राहते. निसर्गातील अनेक रूपांमुळे अनेकेश्वरवादाप्रमाणे
हे आहे असे वाटण्याचा संभव आहे. पण येथे देवता केवळ नावाने ओळखल्या आहेत. अनेकेश्वरवादातील देवता बऱ्या वाईट दोन्ही गुणांनी युक्त असतात व त्यांची रूपे बिभत्सही असू शकतात. वैदिक देवता या नैतिकतेचा जो अत्युच्च बिंदू ऋषिंना कळला त्याचे प्रतिनिधित्व करतात. त्या सर्व शुद्ध, पवित्र, भल्या व उदार आहेत. तसेच त्यांच्यात कोणतेही व्यंग नाही. कोणतीही देवता जरठ, पंगू नसून ती सौंदर्याचा अत्युच्च आदर्श असते. सारांश गुण वेगळे दर्शविले तरी या देवता भावनेने व तत्त्वाने एक आहेत.
१) वेदांतील ईश्वराचे प्रत्येक स्वरूप सौंदर्य व वैभव या दृष्टीने महत्त्वाचे असते. हे वैभव, तेज (ज्योति), कीर्ति (भर्गः) महत्त्व (महः), आकर्षकता (श्री), सौंदर्य (वपु), आश्चर्य (चित्र) या अनेक रुपाने व्यक्त झाले आहे. ईश्वराला यामुळे 'देव' तेजस्वी ही उपाधी प्राप्त झाली. देव हा शब्द सामान्य नाम बनला आहे.
२) वैदिक देवताही नैतिकतेला रूप व आकार देते. त्यासाठी सत्य व ऋत या दोन परिभाषा वापरल्या आहेत. सत्य हे स्पष्ट आहे. ऋत म्हणजे शाश्वत नियमांचे पालन. सत्य व ऋत या तत्त्वांचे प्रतिक नसलेली एकही देवता वेदांत नाही हे आवर्जून सांगितले पाहिजे. ईश्वर हा 'सत्य धर्मनः' सत्य हाच जीवनाचा सिद्धांत आहे असा ईश्वर 'सत्य, शिव' सत्य हाच ज्याच्या सामर्थ्याचा उगम आहे. सत्यस्यसूनू, सत्याचा पुत्र इ. विशेषणे ईश्वराला लावलेली आहेत. ईश्वर म्हणजे सत्यम् अथवा तत्त्वज्ञानाच्या भाषेत सत् म्हणजे वास्तव तसेच ईश्वराला ऋतवान देवतेला ऋतवारी अथवा ऋतम् ऋताचा संरक्षक म्हटले आहे. आता धर्म अशा मौलिक तत्त्वांकडे पोचतो की ती तत्त्वे ईश्वराशी संबंध नसताही मनुष्याची उद्दीष्टे होऊ शकतात. बुद्धाने ज्याप्रमाणे ईश्वराचा आधार न घेता काही नैतिक मूल्यांचा आग्रहाने पुरस्कार केला त्या प्रमाणेच वेदधर्मही करतो. भारतात नास्तिकाला विरोध नसून जो नैतिक मूल्ये मानत नाही त्याला विरोध आहे. पृठ्वीचे पालन वेदांप्रमाणे ईश्वरेच्छेने होत नसून ते सत्य व ऋतांनी होते. परमेश्वराचा साक्षात्कार ऋतामधून होतो असे वेदांनी म्हटले आहे. निसर्गाचे सौंदर्य व वैभव याचे प्रतीक म्हणूनच केवळ ईश्वर सर्वश्रेष्ठ नाही तर तो सद्गुण, सुबुद्धता, भलेपणा, स्त्रीपुरुषांतील मनाची अत्युच्च उदारता यांचेही स्वरूप आहे म्हणून वैदिक प्रार्थनांमध्ये देवतेचे नाव पालटत असले तरी तिचा उल्लेख
अत्युच्च विशेषणाने केलेला असतो. ईश्वराला भिन्नभिन्न नावावरील सूक्तांतून कवीतम, वीरतम, संतम तसेच पितृतम, मातृतम असे म्हटले आहे. येथे गुण व प्रतिष्ठा निर्देशिली असून ज्याअर्थी दोन भिन्न नावांना जरी ते विशेषण लावले असले तरी ती एकच आहेत. हाच त्याचा अर्थ निष्पन्न होतो. अग्नि व ब्रहस्पती या दोघांना विप्रतम म्हटले आहे. अर्थातच नावे भिन्न असली तरी ती ज्याची नावे तो ईश्वर एकच आहे हे सिद्ध होते.
३) अमूर्त स्वरूप – मानसिक व नैतिक दृष्ट्या ईश्वराचे एकत्व स्पष्ट केल्यानंतर वेदांनी अमूर्त अथवा अध्यात्मिक सिद्धांत म्हणूनही एकत्व प्रतिपादले आहे. 'एकम् सत् विप्रा बहूधा वदंति' एकालाच ऋषिंनी अनेक नावांनी संबोधले आहे. 'एकम् संतम् बहूधा कल्पयंति' सर्व देवता इंद्राच्या ठिकाणी म्हणजे एक आहेत. अग्नीच्या ठिकाणी आहेत तसेच ईश्वराला विश्वदेव म्हटले आहे. निराकार, निर्गुण परमेश्वराला 'एकम् तत् सत् अक्षरम् ब्रह्म' असे नपुसकलिंगी एकवचनी शब्द वेदांनी वापरले आहेत. सृष्टीच्या भव्यतेत दृग्गोचर झालेले निर्गुण ब्रह्म वर्णिताना जेथे वेद देव (तेजस्वी) या शब्दाने वा इतर अनेक नावांनी त्याला संबोधतात व एकवचन, द्विवचन व बहुवचनी प्रयोग करतात, तरीही जेव्हा पहिली प्रभात उदेली तेव्हा 'अक्षरम् देवस्' म्हणून प्रगट झाले आणि परमेश्वराचे एकत्व महान आहे असे वेदांनी आग्रहाने सांगितले आहे. वैदिक ईश्वरवादाचा हा अमूर्त अथवा अध्यात्मिक पाया आहे. सृष्टिनिर्माण सूक्तांत ब्रह्म, निर्मळ ब्रह्म प्रमुख आहे. तेथे म्हटले आहे की सृष्टीपूर्वी ते वायुरहित केवळ स्वप्रेरणेने अस्तित्वात असून त्याचाच साक्षात्कार सृष्टी निर्मितीत झाला. देव अथवा ब्रह्माचे व्यक्त स्वरूप आहे. इतरत्र म्हटले आहे 'ते सृष्टीत सर्वश्रेष्ठ होते, त्याच्यापासूनच सर्व शक्तिमान परमेश्वर स्पष्ट झाला.' ऋग्वेदाच्या पहिल्या व दहाव्या मंडलातच ब्रह्माचे वर्णन आहे असे नाही. तिसऱ्यातही ते विस्तृत आहे.
एका विशिष्ट स्थळी राहणाऱ्या एकेश्वराचे हे तत्त्व नसून अखिल विश्वातील प्रत्येक वस्तूत भरलेल्या दैवी अस्तित्वाचे ते तत्त्व येथे प्रतिपादन केले आहे. हे तत्त्व अर्थातच अमूर्त, अध्यात्मिक अनुभवाने जाणता येते. सारांश वैदिक दैववाद हा अनेकातील एक अशा परमेश्वरवादापेक्षा अधिक सूक्ष्म व प्राचीन अथवा अर्वाचीन सुसंकृत कल्पनांपेक्षा अधिक प्रगल्भ आहे. वेदातील देव एकएकटे अथवा समूहरुपाने त्या निराकार निर्गुणाशी एकात्म दाखविले जातात त्यावरून
हे आणखी स्पष्ट होते. “अग्नि ते आहे, आदित्य ते आहे. वायू, चंद्रमस तेज ते आहे. ब्रह्म, आप ते आहेत. प्रजापति तो आहे.” येथे पुल्लिंगी, स्त्रिलिंगी, एकवचनी, बहुवचनी ह्या सर्वांना "त्या"च्याशी एकात्म ठरविले असून ते मध्येच ते व तो समाविष्ट आहेत. यजुर्वेदातील एका ऋचेत ईश्वराचा उल्लेख 'तत् सत्' असा नपुसकलिंगी केला अहे आहे पण पुढच्याच ओळीत त्याला 'विभू" असे पुल्लिंगी संबोधले आहे. ईश्वराचे एकत्व म्हणजे ईश्वर नावाची एक व्यक्ती असे नसून वेदांप्रमाणे तो सर्वव्यापी व सर्व श्रेष्ठ असून सर्व वस्तुजात त्याच्या ठिकाणी एकवटलेली असते. 'यत्र विश्वम् भवत्येक नीड्यम्" ज्याच्या ठिकाणी सर्व विश्वाला आश्रय मिळतो हा एकेश्वरवाद शुद्ध सुबुद्ध तत्त्वाचा आहे" तुम्ही सगळे आपल्या ओजासह (आत्मबल) केवळ एकाकडे देवाकडे या तो मानवाचा अतिथी आहे. तो प्रथम आहे त्याला तुम्ही हवे आहां. त्याच्याकडे सर्व मार्ग वळतात. खरोखर तो केवळ एक आहे" सामवेद.
अथर्ववेदात ही कल्पना संख्येच्या परिभाषेत मांडली आहे. “जो जाणतो, त्याच्या दृष्टीने तो ईश्वर एक आहे. त्याला दुसरा, तिसरा, चौथा अथवा पाचवा, सहावा, सातवा म्हणत नाहीत. ज्याला श्वास आहे व ज्याला श्वास नाही त्या सर्वांना तो पाहतो. जगज्जेती अशी त्याची शक्ती आहे.” पुढील ऋचेत तर अधिक समावेशक वळण आहे. “तो एकमेव आहे, त्याच्या ठिकाणी सर्व देवता एकमेव होतात.” एकेश्वरवादात सर्वांवर वर्चस्व असणारा एक परमेश्वर सांगितला जातो. वैदिक ईश्वरवादात "अनेकात एक व एकात अनेक" हा सिद्धांत मांडला आहे. अद्वैताच्या तर्काने एकच सत्य आहे व अनेक असत्य आहे असे वरील कल्पनेवर भाष्य करणे शक्य असले तरी ही वैदिक कल्पना अद्वैतापलिकडील आहे. गूढ अनुभवावरून एकही सत्य आहे, अनेकही सत्य आहेत कारण ते अनेक एकाशी एकात्म आहेत असे वेद सांगतात. ज्यांना गूढवाद मान्य आहे त्यांना ते कळेल. 'अदिती आकाश आहे, अदिती अंतराळ आहे, अदिती माता, पिता, पुत्र आहे. अदिती सर्व देवता व पंचजन आहे. जे जन्मले आहे व जे जन्मणार आहे ते सर्व अदिती आहे.” काळ व स्थळापलिकडे हा विचार धावला आहे. पुढील ऋचेत मात्रा अथवा महत्त्व उरले नाही.” दोन्ही समुद्र हे वरुणाच्या कुक्षी आहेत. तो या सूक्ष्म जलबिंदूत राहतो.” त्या एकाचा सर्वव्यापीपणा केवळ विश्वापुरता नसून तो मानवी विश्वातही आहे.
ब्रह्माला उद्देशून म्हटले आहे "तू पुरुष आहेस, स्त्री आहेस, मुलगा व कुमारी ही आहेस. काठी टेकीत अडखळत चालणारा म्हातारा तू आहेस. तू सर्वत्र भरलेला आहेस.” अर्थववेद
वेदांनी ईश्वराचा स्वतंत्र असा पुरुषवाचक, स्त्रीवाचक, नपुसकलिंगी अथवा एकवचनी, द्विवचनी, अथवा अनेकवचनी साक्षात्कार थोडाही दुर्लक्षलेला नाही. प्रत्येक अनुभवातील काव्य त्यात आहे. अग्नीला पण पुरुष व उषालाही 'एकम्' पण स्त्री म्हणून संबोधिले आहे. 'अनेक ठिकाणी प्रज्वलित केलेला अग्नी एक आहे तसाच सर्वांवर प्रकाशणारा सूर्य एक आहे. ह्या सर्वांना पाजळणारी उषा आहे. जे एक आहे ते हे सर्व झाले आहे. काव्य व गूढवादाची ही अभिव्यक्ती आहे. त्या सखोल, गंभीर अनुभवाचे व बौद्धिक विश्लेषण म्हणजे देववाद. याच केवलाला वेदांत ॐ व आत्मा व सर्वात्मा म्हटले आहे.

वैदिक धर्माची काही मुलभूत तत्त्वे
भारतात निघालेल्या निरनिराळ्या पंथांविषयी असे म्हणता येते की मनुष्याची श्रद्धा काय आहे यापेक्षा त्याचा आचार काय आहे याचे महत्त्व अधिक मानले जाते. नैतिक आचरण व अध्यात्मिक धारणा यांचे महत्त्व व बौद्धिक स्वीकृतीपेक्षा अधिक असते. जीवनाला दिशा देणारा नैतिक सिद्धांत व आत्म्याचे नियमन हे धर्माचे पाय आहेत. यालाच धर्म असे म्हटले आहे. इंग्रजीत यालाच फॉर्म पद्धती असे म्हणतात. धर्म हा अस्तित्वात असतोच असे गृहीत धरले आहे. विष्णूला धर्माचा आधार व अग्नीला धर्माचा अध्यक्ष म्हटले आहे. महाभारतात 'धर्मो धारयते प्रजाः' अशी व्याख्या केली आहे. ईश्वराला माना अथवा मन मानू नका. धर्म पाळलाच पाहिजे असे बुद्धाचे प्रतिपादन आहे. प्राचीन भारतात आस्तिक, नास्तिक अथवा अश्रद्ध कोणी असोत, धर्माचे पालन हे आवश्यक मानले गेले. धर्म शब्दांत कोणत्या तत्त्वांचा समावेश होतो ते पाहूया. अथर्ववेदाप्रमाणे 'पृथ्वीम् धर्मणा धृतम्' धर्म हा पृथ्वीचा आधार आहे. त्याच सूक्तात 'सत्यम् बृहद् ऋतम् द्युग्राम दीक्षा तपो ब्रह्म यज्ञ पृथ्वीं धारयन्ति" अशी ऋचा आहे. सत्य शाश्वत व्यवस्था, जी थोर व कठोर आहे. समर्पण, वैराग्य, प्रार्थना व हवन हे पृथ्वीचे आधार आहेत. हेच वैदिक धर्माचे मुलभूत आधार आहेत.

यज्ञः एकच विधी
वैदिक विधी हा वरील विचारसरणीला धरूनच आहे. येथे देवता कोणतीही असो विधी एकच असतो. तेच हवन व त्याच आहुती. प्रार्थना मंत्रात देवतेचा उल्लेख येतो तेवढाच. वेदांनी संगीत व काव्य हीच प्रार्थना माध्यमे निश्चित केली. अनेकेश्वर पद्धतीत मूर्तिकलेचा आश्रय घेतला आहे. मूर्ती या इतक्या भिन्न असतात की त्यांच्यात एकात्मता दाखविणे अशक्य होते. वेदांत पुल्लिंगी अग्नी व सूर्य आणि स्त्रीलिंगी उषा यांना 'एकम्' एकच म्हटले आहे. अर्थातच यांच्या मूर्ती करणे अशक्य आहे. वैदिक देवतांना आकार नाही. काव्यात काय ते त्यांना मूर्तरूप दिलेले दिसते. उषाविषयी म्हटले आहे. “आकाशाची ही कन्या आईने सजविलेली ही वधू होय.” यावरून आपण एखाद्या स्त्रीची मूर्ती लागल्यास ती चूक होईल.
वेदांनी चार वर्ण कल्पिले आहेत व समाज पुरुषाचे मुख म्हणजे ब्राह्मण, बाहू म्हणजे क्षत्रिय, मांड्या म्हणजे वैश्य व पाय म्हणजे शूद्र होत. अर्थातच यात लहान मोठे, उच्च नीच काही नाही हे सर्व समान आहेत. वेदांत समाजपुरूषाला सहत्रशीर्ष, सहस्त्रपाद इ. म्हटले आहे. याची मूर्ती कशी होणार? अग्नीला, इंद्राला बाप म्हटले आहे तसेच आई म्हटले आहे. निराकाराला सुपर्ण म्हटले आहे. तेथे मूर्तीची कल्पना केल्यास त्यातील भव्य काव्य नष्ट होईल. अथर्ववेदात मनुष्याचे अनेक वंश व अनेक धर्म उल्लेखिले आहेत. “अनेक भाषा बोलणारे लोक व निवासाच्या स्थानानुसार त्यांचे अनेक धर्म आहेत.” वेदांत आर्य आणि दस्यू यांचा विरोध दाखविला आहे हा वंश विरोध नसून अज्ञान व ज्ञान, दुष्टपणा व भलेपणा, वैध व अवैध यातील तो विरोध आहे. सर्व दुष्ट शक्तींविरुद्ध वेदांनी युद्ध करण्याचे उघड आवाहन केले आहे. इंद्राला 'वृत्रहंतम्' म्हटले आहे. वृत्र म्हणजे पाप, शत्रू तो परकीय असो की आप्त त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे. पुरोगामी लोकात कोणी दुष्ट प्रवृत्ती असतील तर त्यांना समूळ नष्ट केलेच पाहिजे. असे ऋग्वेद सांगतो. ऋग्वेदात असेही म्हटले आहे की "परमेश्वर हा आर्य व दस्यू दोघांचा आहे. परकीयांविरुद्ध केलेल्या दुष्कृत्याच्या क्षमेसाठीही एक सूक्त आहे. ईश्वर हा समदेश्य तसाच विदेश्य आहे असे अथर्ववेद म्हणतो. परकीयांबरोबर "समज्ञान" स्थापन झाल्यास युद्ध संपतील असेही म्हटले आहे.
“अनेकात एक" हे तत्त्व सर्व मानवी प्रश्नात आढळते. “सर्वाणि भूतानि" सर्व सजीव प्राण्यांना हे तत्त्व लागू आहे असे सांगणारे अनेक मंत्र आहेत. याचा परिपाक 'सर्वाणि शांति" वैश्विक एकात्मता या भव्य कल्पनेत होतो. वैदिक धर्मतत्त्व हे एक आनुषंगिक धर्मतत्त्व नसून जीवनाला ते सर्वत्र लागू पडते. अनेक देवतांचे पूजक भिन्न गुणांच्या व प्रकृतीच्या देवतांची कल्पना करीत ग्रीक, इजिप्शियन, रोमन व शेवटी हिंदू देवता समूह या प्रकारच्या आहेत. वेदांनी फार पूर्वी देवतांची कल्पना केली तरी त्या एकाचीच नांवे आहेत. त्याना भिन्न रूप व गुण नाहीत असे स्पष्ट केले. ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलाच्या आरंभी धर्मतत्त्वांच्या एकतेचे आदर्श उभे केले आहेत. अशा कल्पना गूढ व अनुभव प्राप्त झालेल्या व वास्तवातून सत्य शोधणाऱ्या महान द्रष्ट्यांनाच सुचणे शक्य आहे. ऋषी अग्नीची स्तुती करतो पण इतरांनी इंद्र, वरुण इ. नावानी ईश्वराला आळविलेले असते म्हणून तो म्हणतो 'हे अग्नि, तूच इंद्र, वरुण, ब्रह्मणस्पती, विष्णू, मित्र, अर्यमान, अदिती, भारती, सरस्वती' काही पुरातत्त्ववेत्यांनी याला केवळ अनेकेश्वरवाद म्हटले आहे. त्या आदिम नावाने केवळ आपल्या देवाचा बडेजाव करण्यासाठी तू हा आहेस तू तो आहेस असे म्हटले आहे, असे तर्कट केले आहे. वेदांत अनेक नावे आहेत पण आकार, रूप इ. नाहीत. प्रत्येक देवता दुसरीशी अथवा अनेकाशी व सर्व त्या निराकार निर्गुणाशी एकात्म आहेत असे वारंवार दर्शविले आहे. ग्रीक, रोमन व हिंदू देवतांविषयी असे म्हणता येईल काय?

सत्यः
वेदांनी सत्याला प्रथम व विधीला शेवटचे स्थान दिले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या धर्मात इतर धर्माप्रमाणे श्रद्धेच्या तत्त्वांची मालिका नाही. वेदधर्माच्या इतिहासात सर्व काळी, सत्याला मुळीच संकोच न करता प्रमुख स्थान देण्यात आले आहे. सत्य शोधणे, केवळ श्रद्धेला चिटकून न राहणे हे प्रत्येक युगाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय इतिहासात सर्व काळी स्वतंत्र व निष्ठावान मनाने सत्याचा शोध घेण्यात मग्न असलेले मुनी, ऋषी यामुळे या देशात तत्त्वज्ञानाची व अध्यात्माची प्रवृत्ती टिकून राहिली.
वेदांत सत्याला देवत्वाचे मर्म म्हटले आहे. अथर्ववेदात 'सविता सत्य धर्मा" सत्य हेच सवित्याच्या अस्तित्वाचा आधार आहे. ऋग्वेदाने देव हा सत्याचा अविष्कार आहे असे अनेकदा म्हटले आहे. भारतात धर्माचा वाद आस्तिक व नास्तिक यात नसून तो सत्य व असत्य
यात आहे. “आपण सत्यरुप इंद्राची उपासना करुया अनृताची नव्हे" असे एक ऋषी म्हणतो. “मी अनृताचा आपला देव मानला नाही.” खरी प्रार्थना व खरा विधी सत्ययुक्त हृदयातून व जीवनातूनच येतो. 'सत्यम् वद, सत्य कर्मन' धार्मिक प्रगतीचा मार्ग म्हणजे सत्यमार्ग असे मुंडकोपनिषदात म्हटले आहे. दैवी मार्ग हा सत्यातून आखलेला आहे याच मार्गाने आपले सर्व हेतू पूर्ण झालेले संत सत्याच्या महान निवासाप्रत चढून जातात. आत्मा सत्यानेच सापडेल. 'सत्यमेव जयते नानृतम्' असे येथे अभिमानाने म्हटले आहे. नैतिकदृष्ट्या सत्य म्हणजे खरे बोलणे, निष्ठा ठेवणे. अध्यात्मिकदृष्ट्या सत्य म्हणजे 'शाश्वत' त्यालाच सत् म्हटले आहे.
सत्य हे आचरणात आणावयाचे. सत् हा संशोधनाचा, ज्ञानाचा, अनुभवाचा, साक्षात्काराचा विषय आहे. म्हणून ऋषी प्रार्थना करतो, “असतो मा सत् गमय" या अध्यात्मिक वृत्तीनेच ऋषी विचारतो, “मला ज्ञान नाही. ज्यांना ज्ञान आहे त्यांना ज्ञानासाठी विचारतो. “अजात असा तो कोण?” हाच प्रश्न पुढे प्रार्थनेत आहे. “कस्मै देवाय हविषा विधेम" यजुर्वेदात एक ऋषी आपला अनुभव सांगतो. “घरामध्ये सर्व माणसे एकोप्याने राहतात तसेच विश्वात आहे. एका प्रवाशाने दुसऱ्यास माहिती द्यावी त्याप्रमाणे हा अनुभव सर्वत्र पोचविला जातो. प्रदेशाची माहिती नसलेला, माहिती असलेल्याला विचारतो व जाणत्याकडून माहिती मिळवून पुढे प्रवास करतो. ज्याला अद्याप दूर जावयाचे आहे तो 'सत्' विषयी मौन धारण करील. बुद्धाने याप्रमाणे केले पण 'सत्य' हे जीवनात पदोपदी आवश्यक असते. वैदिक ऋषींनी 'सत्' आणि 'असत्' या पलीकडील अवस्थेची कल्पना केली आहे. पण सत्य हे जीवनातील ध्येय आहे. ते शाश्वत आहे. अंतिम आहे. ते पृथ्वीला सांभाळणारे आहे. 'सत्यं जिन्व' ऋषी म्हणतो 'सत्यं वदिष्यामि' मी सत्य बोलेन.
ऋत – ऋताचे नैतिक स्वरूप
धर्माचे पहिले मर्म सत्य आहे. दुसरे ऋत आहे. ऋत म्हणजे शाश्वत व्यवस्था, शाश्वत सिद्धांत. ऋताचा अभाव दर्शविणारा शब्द अनृत म्हणजे अनवस्था, गोंधळ. ऋग्वेदात म्हटले आहे की सत्य व ऋत हे सर्वारंभी उत्पन्न झाले व ते अध्यात्मिक ज्वालेने उत्पन्न झाले. सत्य पृथ्वीला सांभाळते. ऋत हे आकाशाला, अंतराळाला सांभाळते. सोम अर्पण करताना ऋषीने म्हटले आहे की सोम हा ऋताचा पुरस्कर्ता,
ऋतामुळे भव्यता प्राप्त झालेला, सत्यकर्म, सत्यभाषी आहे. “आपण ऋताची स्तुती करावी व सरळ मार्गाने विचार करावा. ऋत हे सत्याहून अधिक व्यापक आहे. न्याय चांगुलपणा यांचा त्यात समावेश आहे. किंबहुना ऋत म्हणजेच धर्म, ऋत व पाप (दुष्टपणा) यांचा तीव्र विरोध आहे. म्हणूनच ऋताला कठोर म्हटले आहे. बृहस्पती हा ऋताच्या रथात बसून पापाचा नाश करतो असे सांगून म्हटले आहे, “दुष्टांचा, तमाचा पाठलाग करून ऋताच्या तेजस्वी रथात तू चढतोस. शत्रूचे दमन करणारा तो भयानक रथ, दुष्टांना तू ठार करतोस, ज्योतीचे दार तोडून तू ज्योतीचा प्रकाश सर्वत्र पसरवितोस.” अशा रितीने नैतिक नियम व शाश्वत नियम या दोघांचा समन्वय होतो. सर्व निसर्गाला लागू असणारा वैश्विक सिद्धांत व नैतिक नियम हे जुळून येतात. “सूर्य, चंद्र ज्याप्रमाणे आपले मार्ग धरतात तसे आम्ही भलेपणाच्या मार्गाने जाऊ.” असे ऋषी ऋग्वेदात म्हणतो. “ऋताच्या मार्गाने दुःख वेदनेपलिकडे आम्हांस न्या" अशी एक प्रार्थना आहे. ऋताचे आकलन होऊन ज्याने त्याचा स्वीकार केला आहे तो आस्तिक, सश्रद्ध, जो शाश्वत मूल्यांना ओळखत नाही व चांगुलपणाचा पुरस्कार करून पापाचा प्रतिकार करीत नाही तो खरा नास्तिक. ऋताला अडथळा आणणारा, तम व पाप यांना उत्तेजन देणारा जो वृत्र, त्याचा इंद्र नाश करतो. दास व दस्यु हे अमानुष वृत्तीचे होत. निसर्गात व जीवनात ऋताचा उपयोग व संचार जाणणे हाच साक्षात्कार होय. काहीजण विचारतात "इंद्राला कोणी पाहिले आहे? इंद्र नाहींच. आम्ही कोणाची उपासना करावी.” “हे गायका, हा मी आहे. येथे मला बघ. जे आहे त्या सर्वांहून अधिक भव्य मी आहे. ऋताच्या आज्ञांमुळे मी बलवान झाले झालो आहे. मी जेव्हा हाणतो तेव्हा भुगोलांना दुभंगतो.” नैतिक सिद्धांताच्या कठोर आचरणाने व ऋताच्या पालनाने विश्वात भव्यता आली आहे. त्यांतच इंद्र आहे. ऋताने विश्वाला सौष्ठव व एकात्मता दिली आहे. सारी भव्यता व सारे सौंदर्य ऋतामुळे येते. उदा. पावसाळा आला की पर्जन्य आरंभतो व पाणी अनेक धारांनी कुशल, खेळकर, कुमारिकेप्रमाणे उसळूं लागते.” निसर्गाचे सारे सौंदर्य, उगवत्या उषेचे अप्रतिम लावण्य हे सर्व ऋताच्या आचरणांमुळेच आलेले असते.” "उषा प्रत्यही आपला संकेत पाळण्यास येते ती ऋताविरुद्ध वागत नाही.” नैसर्गिक नियमांमुळे विश्वाची प्रतिष्ठा राहते, नैतिक नियमांनी जीवन बनते. त्याप्रमाणे आकृतीच्या नियमांनी सौंदर्य प्राप्त होते. ऋताचा शाश्वत सिद्धांताचा पाया स्थिर आहे. त्याच्याच आकृतीत अनेक प्रकारचे सौंदर्य आहे. म्हणूनच ऋताचे पालन करविणार्‍या वैदिक दैवता या सर्व सुंदर सत् चरित्र व विधियुक्त आहेत. सौंदर्य हे त्यांचे महत्त्वाचे लक्षण आहे. त्यास विशेषणे लावतात व ती सर्व सार्थ आहेत. पुढे पुढील ऋचेत अग्नीच्या सौंदर्याचे दर्शन आहे. “हे आश्चर्यकारक देवा, आश्चर्याचा अधिपती जे अत्यंत आश्चर्यकारक आहे, जीवनदायी आहे ते आम्हांस दे. हे तेजस्वी देवा, तुझ्या तेजाने तुझ्या गायकाला महान संपत्ती, तेजस्वी वीरांनी युक्त अशी संतती दे.” वैश्विक व्यवस्थेच्या पाठीशी जे लावण्यरुप आहे त्याचा प्रतिनिधी वरुण आहे. जीवनाचा आधार, उषाच्या किरणांची गुप्त नावे ज्यास अवगत आहेत तो कवी आपल्या काव्य शक्तीने अनेक आकार वाढवितो.” इंद्राविषयी म्हटले आहे की तो दिसण्यास आकाशासारखा सुंदर आहे व एखाद्या चपळ नर्तकीप्रमाणे आकर्षक आहे.